Sunday, July 27, 2025
Homeअध्यात्मकधी आहे कोजागिरी पौर्णिमा? जाणून घ्या आख्यायिका, पूजा मुहूर्त आणि महत्त्व

कधी आहे कोजागिरी पौर्णिमा? जाणून घ्या आख्यायिका, पूजा मुहूर्त आणि महत्त्व

ताजी बातमी ऑनलाईन टीम

सर्व पौर्णिमांमध्ये शरद पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजेच शरद पौर्णिमेलाच गोजागिरी पौर्णिमा देखील म्हटले जाते. कोजागिरी पौर्णिमेला देवी लक्ष्मीची विधीवत पूजा केली जाते. महाराष्ट्रासह, पश्चिम बंगाल, बिहार, आसाम आणि ओरिसा येथे कोजागिरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. कोजागिरी पौर्णिमेला मध्यरात्री पूजा केल्याने देवी लक्ष्मीची प्रसन्न होते आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करते असे मानले जाते. यंदा कोजागिरी पौर्णिमा रविवारी 9 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाणार आहे. जाणून घेऊया पूजेचा शुभ मुहूर्त, महत्त्व आणि कोजागिरी पौर्णिमेची अख्यायिका.



आकाशातून होतो अमृताचा वर्षाव
आश्विन महिन्याच्या पौर्णिमा तिथीला आकाशातून जमिनीवर अमृताचा वर्षाव होतो असे मानले जाते. कारण कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्रकिरणांमध्ये आरोग्याच्या दृष्टीने अनेक औषधी गुणधर्म असतात अशी मान्यता आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्रीपासून कार्तिक पौर्णिमेच्या रात्रीपर्यंत आकाश कंदील लावून दीपदान करण्याला विशेष महत्त्व आहे. दिव्याचे दान केल्याने घरातील सर्व दुःख, दारिद्र्य नष्ट होते आणि घरात सुख-समृद्धी येते असे मानले जाते. कार्तिक महिन्यात काशीमध्ये स्नान करून गंगेच्या तीरावर दिवा लावण्याची देखील परंपरा आहे.

कोजागिरी पौर्णिमा 2022 शुभ मुहूर्त (Kojagiri Purnima 2022 Shubh Muhurat)
यावर्षी 9 ऑक्टोबर 2022 रोजी कोजागिरी पौर्णिमा आहे. कोजागिरी पौर्णिमेला देवी लक्ष्मी भ्रमण करण्यासाठी बाहेर पडते अशी धार्मिक मान्यता आहे. या दिवशी उपवास करून रात्री देवीची पूजा केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि भक्तांना आशीर्वाद देते असे मानले जाते. आश्विन शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा 9 ऑक्टोबर रोजी पहाटे 03:41 पासून सुरू होईल आणि ही पौर्णिमा तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 10 ऑक्टोबर रोजी पहाटे 02:25 वाजता समाप्त होईल. कोजागिरी पौर्णिमेला देवी लक्ष्मीची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त 9 ऑक्टोबर रोजी रात्री 11.50 ते 10 ऑक्टोबर रोजी पहाटे 12.30 वाजेपर्यंत असेल. म्हणजेच पुजेसाठी एकूण 49 मिनिटांचा कालावधी असेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -