Friday, November 22, 2024
Homeआरोग्यसावधान! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचं दिवाळीवर सावट, सर्दी-खोकल्याकडे करू नका दुर्लक्ष

सावधान! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचं दिवाळीवर सावट, सर्दी-खोकल्याकडे करू नका दुर्लक्ष

ऐनदिवाळीत देशातील नागरिकांची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे . देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे नवे सब व्हेरिएंट (New Covid Variant) BA.5.1.7 आणि BA.7 ने दस्तक दिली आहे. सध्या देशात BF.7 चा एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळी सणावर देखील कोरोनाचं सावट राहाणार असल्याची शक्यता एक्सपर्ट्सनी वर्तवली आहे. फेस्टिव्ह सीझनमध्ये नागरिकांनी अत्यावश्यक सावधगिरी बाळगावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. नव्या सब व्हेरिएंटचं संक्रमण झपाट्याने होत असल्याने कोरोनाची नवी लाट येते की काय, अशी चिंता देखील व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोनाच्या लाटेने संपूर्ण जग बदलून टाकलं आहे. सर्वत्र भीतीचं वातावरण असताना चिंता वाढवणारी माहिती समोर आहे. कोरोना संपला, असा समज करू नका. कारण कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या सब व्हेरिएंटने देशात पुन्हा दस्तक दिली आहे. BA.5.1.7 आणि B F.7 असे या नव्या व्हेरिएंटचे नाव आहे. या व्हेरिएंटचं संक्रमण झपाट्याने होत असल्याने ऐन दिवाळीत कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे.

देशात कुठे आढळाला BF.7 चा पहिला रुग्ण?

ओमिक्रॉन BF.7 ला ओमिक्रॉन स्पॉन असे देखील संबोधले जात आहे. देशात गुजरातमध्ये BF.7 चा पहिला रुग्ण आढळून आला आहे. गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरमध्ये तपासणीसाठी आलेल्या नमुन्यात BF.7 चा व्हेरिएंट आढळून आला आहे. दरम्यान, सगळ्यात आधी नॉर्थवेस्ट चीनमधील मंगोलिया ऑटोनोमन रिझनमध्ये ओमिक्रॉनचा नवा सब व्हेरिएंट BF.7 पहिला रुग्ण आढळून आला होता. चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढीच हाच व्हेरिएंट जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि बेल्जियम सारख्या देशांमध्ये देखील BF.7 चे रुग्ण आढळून आले आहेत.

पुढील 2 -3 आठवडे महत्त्वाचे…

नॅशनल टेक्निकल एडव्हायझरी ग्रुप ऑफ इम्युनाइझेशनचे (NTAGA) चेअरमन डॉ. एन.के.अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीनंतरचे दोन-तीन आठवडे महत्त्वाचे ठरणार आहे. कोरोना आपल्या आसपासच आहे, असं समजून नागरिकांनी सतर्क राहायला हवे. जगभरातील वेगवेगळ्या देशात कोरोनाचे नव्हे व्हेरिएंट आढळून येत आहेत. त्याला आता आपला देश देखील अपवाद ठरलेला नाही. ओमिक्रॉनच्या सब व्हेरिएंटचा रुग्ण आपल्या देशात देखील आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क व्हायला हवे. फेस्टिव्ह सीझनमध्ये आवश्यक ती सावधगिरी बाळगायला हवी. कोरोनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन देखील डॉ. अरोरा यांनी केलं आहे.

सर्दी-खोकल्याकडे दुर्लक्ष करू नका..

ओमिक्रॉनचे सब व्हेरिएंट BA.5.1.7 आणि B F.7 चा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. देशात देखील या व्हेरिएंटचा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे साधा सर्दी-खोकला झाला असेल तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांकडे जावून आवश्यक त्या तपासण्या करून घ्या, असे आवाहन देखील एक्सपर्ट्सनी केले आहे.

काय आहेत ओमिक्रॉन BF.7 ची सामान्य लक्षणे..?

– वारंवार सर्दी-खोकला येणे.
– ऐकण्यात समस्या येणे.
– छातीत वेदना.
– अंग थरथरणे.
– गंध न कळणे.
– अशक्तपण येणे

दिवाळीत कोणती सावधगिरी बाळगाल?

ओमिक्रॉनचे सब व्हेरिएंट आधी झालेले इंफेक्शन किंवा व्हेक्सिनेशनने तयार झालेल्या एंटीबॉडीजला देखील जुमानत नाही. त्यामुळे सावधगिरी हाच एकमेव उपाय आहे.

– नवे व्हेरिंएंट आणि सब व्हेरिएंटचा संसर्ग पसरल्यानंतर कोविड 19 च्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असते.
– कमी रोगप्रतिकार शक्ती असलेल्या नागरिकांमध्ये लक्षणे आढळण्याची शक्यता जास्त असते. अशा नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
– वारंवार हात धुवावे. सेनिटायझरचा वापर करावा.
– दिवाळीची खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडल्यानंतर सोशल डिस्टेंसिंगच्या नियमाचा काटेकोरपणे पालन करावे.
– नाक आणि तोंड झाकलं जाईल, असा मास्क वापरावा. प्रवासादरम्यान देखील नागरिकांनी मास्क वापरावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -