Sunday, February 22, 2026
HomeसांगलीSangli : बुलेरोच्या धडकेत ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू

Sangli : बुलेरोच्या धडकेत ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू

मिरज तालुक्यातील भोसे गावच्या हद्दीत रत्नागिरी – नागपूर राष्ट्रीय महामार्गावर बोलेरो आणि ट्रॅक्टरची धडकन मोठा अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्या ट्रॅक्टर चालकाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. रमेश चन्नाप्पा पुजारी (वय 56, रा. भोसे) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. अपघातानंतर बुलेरो चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

रमेश पुजारी हे शेतातील काम आटोपून ट्रॅक्टर वरून घरी निघाले होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या बुलेरो कारने त्यांना धडक दिली. अपघात इतका भीषण होता की ट्रॅक्टर आणि कार ही दोन्ही वाहने महामार्गालगत असणाऱ्या शेतात जाऊन पलटी झाले.

यामध्ये रमेश पुजारी हे गंभीर जखमी झाले. ग्रामस्थांनी त्यांना उपचारासाठी तातडीने मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यांचा मृत्यू झाला. याबाबत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -