Friday, December 27, 2024
Homenewsदिल्ली कोर्टात अचानक गोळीबार : कुख्यात गुंड व चौघांचा मृत्यू

दिल्ली कोर्टात अचानक गोळीबार : कुख्यात गुंड व चौघांचा मृत्यू


दिल्ली येथील रोहिणी कोर्टात अचानक बेछूट गोळीबार करण्यात आला, त्यामध्ये गॅंगस्टर जितेंद्र गोगी यांच्यासहीत चार जणांचा मृत्यू झाला. मारेकरी ही वकिलांच्या वेशभूषेत आलेले होते. ही घटना कोर्ट रुम २०७ मध्ये घडली.


समोर आलेल्या माहितीनुसार, जेव्हा हा दिल्ली येथील रोहिणी कोर्टात गोळीबार झाला तेव्हा पोलिसांनीही त्याच्या प्रतिकार करत गोळीबार केला, त्यामध्ये दोन आरोपींचा मृत्यू झाला. कोर्टाच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था असते आणि प्रत्येक प्रवेशद्वारावर तपासणीदेखील केली जाते. पण, हल्लेखोरांनी वकिलांची कपडे परिधान केलेली होती. त्यामुळे प्रवेशद्वार तपासणीत ते सहजपणे कोर्टाच्या आवारात प्रवेश करू शकले.

पोलील या घटनेला गॅंगवाॅर असल्याचे सांगत आहेत आणि हे हल्लेखोर टिल्लू गॅंगची माणसं होती. या हल्ल्यात कुख्यात गुंड जितेंद्र गोगीला निशाणा करण्यात आलं होतं. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. असं सांगितलं जात आहे की, हल्लेखोर वकील आणि न्यायाधीश व जितेंद्र यांच्यामध्ये अगदी थोडेच अंतर होते. तेवढ्यात अचानक गोळीबार सुरू झाला. अशीही माहिती समोर आली आहे की, या हल्ल्यांमध्ये एक महिला वकीलदेखील जखमी झाली आहे.

कुख्यात गुंड जितेंद्र गोगी कोण होता?
गॅंगस्टर गोगी याच्यावर खून, पोलिसांवरील हल्ला, फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेले होते. पोलिसांनी त्याला गुरुग्राम येथून अटक केली होती. जेव्हा त्याला अटक करण्यात आली होती, तेव्हा त्याच्या ८ लाखांचे बक्षीस होते. हल्ल्यामध्ये गोगी हा गंभीर जखमी झाला होता, त्यामुळे रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -