Tuesday, April 23, 2024
Homenewsया तारखेपासून राज्यातील शाळा सुरू होणार, मुख्यमंत्र्यांकडून मान्यता

या तारखेपासून राज्यातील शाळा सुरू होणार, मुख्यमंत्र्यांकडून मान्यता


गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा संसर्ग होऊ नये या भीतीनं बंद असलेल्या शाळा आता पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आहे. दीड वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद होत्या. ऑनलाईन शिक्षण सुरू होतं. आता पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजणार आहे. अखेर राज्यातील शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार ४ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शाळा सुरू करण्यास मान्यता दिली आहे. शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावावर विचार आणि चर्चा करून मान्यता देण्यात आली आहे. अखेर या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळाली आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


गेल्या काही दिवसांपासून शाळा सुरू होणार अशी चर्चा होतीच. मात्र आता शाळा सुरू करण्याबाबत नियमावली कशी असणार आहे याकडे विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष असणार आहे. एकीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे. तर दुसरीकडे शाळा सुरू करण्याबाबतच्या प्रस्तावाला राज्य सरकारनं परवानगी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -