Friday, December 19, 2025
Homeकोल्हापूरKolhapur Crime : घराच्या खापऱ्या काढत केला चुलतीवर बलात्कार, पुतण्याला 'हे' कृत्य...

Kolhapur Crime : घराच्या खापऱ्या काढत केला चुलतीवर बलात्कार, पुतण्याला ‘हे’ कृत्य पडलं महागात

नात्याला काळिमा फासणारी हि घटना घडली होती कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात. धक्कादायक म्हणजे पुतण्याने शेजारी राहणाऱ्या चुलतीवर बलात्कार केला. घराच्या खापऱ्या काढत पुतण्याने प्रवेश केला. चाकूचा धाक दाखवत चुलतीवर बलात्कार केला होता. या प्रकरणी नराधम 30 वर्षीय पुतण्याला 10 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्याता आली. 7 फेब्रुवारी 2021 रोजी हि घडली होती अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश ओंकार देशमुख यांनी आज हा निकाल दिला.

नराधमाला ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी आणि दोन वेगवेगळ्या कलमान्वये प्रत्येकी ६ महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. सर्व शिक्षा एकाचवेळी भोगण्याचे आदेश दिले. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार नराधम पुतण्याने ७ फेब्रुवारी २०२१ रोजी भरदिवसा शेजारीच राहत असलेल्या चुलतीच्या घराच्या खापऱ्या काढून घरात प्रवेश करून चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला होता. नराधमाने पोलिसात तक्रार केल्यास जिवंत सोडणार नाही, अशी धमकीही तिला दिली. या घटनेनंतर चुलतीने चंदगड पोलिसात तक्रार दिल्यानंतर अटक करण्यात आली होती.

या घटनेचा तपास करून पोलिसांनी न्यायालयात चार्जशीट दाखल केले होते. सरकार पक्षाकडून 7 साक्षीदार तपासण्यात आले. पुरावे आणि सरकारी वकील अॅड. एस. ए. तेली यांचा युक्तीवाद ग्राह्य मानून न्यायाधीश देशमुख यांनी सख्ख्या चुलतीवरील बलात्काराच्या आरोपाखाली त्या पुतण्याला शिक्षा ठोठावली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -