Thursday, March 13, 2025
Homeमहाराष्ट्रधक्कादायक : कॉलेज चुकवून ते लग्नाला गेले.रस्त्यात कपडे बदलले, नंतर जे काही...

धक्कादायक : कॉलेज चुकवून ते लग्नाला गेले.रस्त्यात कपडे बदलले, नंतर जे काही समोर आलंय ते…

नाशिकच्या सिन्नर येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा अपघात झाल्याची बाब समोर आली होती, त्याच पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तीन विद्यार्थिनी आणि दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

याशिवाय आणखी तीन जखमी आहेत, त्यात दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातानंतर संपूर्ण नाशिक शहरात हळहळ व्यक्त केली जात असतांना पोलीसांच्या तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे. अपघातातील सर्वजण हे 16 ते 17 वयोगटातील आहे. कॉलेजला दांडी मारून यांनी लग्नाला गेल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे. त्यात आणखी एक बाब म्हणजे घरून महाविद्यालयाच्या ड्रेसवर आलेल्या या सर्वांनी बाहेर गाडीतच दुसरे कपडे बदलले होते. शिवाय रस्त्यातच यांनी पार्टी केल्याचेही समोर आले आहे. अपघात झालेल्या स्विफ्ट कारमध्ये दारूच्या बाटल्या, सिगारेट आणि इतर खाद्यपदार्थ आणि महाविद्यालयाचे ड्रेसही आढळून आले आहे. त्यामुळे हे विद्यार्थी लग्नाला गेले होते की फिरायला गेले होते यावर शंका येत आहे. त्यातच अपघात झालेली स्विफ्ट कारही विद्यार्थ्याने मामाकडून अर्ध्या तासात कॉलेजला जाऊन येतो म्हणून आणली होती.

नाशिक पुणे महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झालाय तर चौघे जखमी झाले असून यातील दोघांची प्रकृती ही चिंताजनक आहे.

सिन्नर जवळील मोहदरी घाटात सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास संगमनेरहून नाशिककडे जाणाऱ्या स्विफ्ट कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट डिव्हायडर वरून दुसऱ्या मार्गावर गेली.

नाशिकहून सिन्नरकडे जाणाऱ्या इनोव्हा आणि स्विफ्ट कारवर जाऊन पलटी झाली, या भीषण अपघातात इनोव्हा आणि स्विफ्ट चालक जखमी झाले आहेत तर धडक देणाऱ्या स्विफ्टमधील पाच जणांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मृतांमध्ये तिन विद्यार्थिनी तर दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. नामांकित महाविद्यालयात अकरावी बारावीचे ते शिक्षण घेत असून 16 ते 17 वयोगटातील हे सर्व आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार संगमनेर हून एका मित्राचे लग्न आटोपून ते नाशिकला परतत होते. 5 प्रवाशांची क्षमता असलेल्या स्विफ्ट कारमध्ये 8 मित्र मैत्रिणी बसले होते.

हर्ष बोडकेच्या मामाची ही कार असून अर्धा तास कॉलेजला जाऊन येतो असे त्याने घरी सांगितले होते, त्याच्याकडे गाडी चालवण्याचा परवाना नसून इतर जण कॉलेजच्या नावाखाली घरून निघाले होते.

इनोव्हा चालकाच्या तक्रारीनूसार मयत हर्ष बोडके वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निष्काळजीपणे गाडी चालवणे, ईतरांच्या मृत्यूस तसेच दुखापतीस कारणीभूत होणे आणि मोटर परिवहन कायद्यानूसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.

अपघातात मृत झालेल्या विद्यार्थ्यांची नावे –

  1. हर्ष बोडके – वय 17
  2. सायली पाटील – वय 17
  3. मयुरी पाटील – वय 16
  4. प्रतीक्षा घुले – वय 17
  5. शुभम तायडे – वय 17
RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -