ईशान किशनने शनिवारी (10 डिसेंबर) बांगलादेशविरुद्ध वनडे करियरमध्ये पहिले द्विशतक झळकावले. त्याच्या कारकिर्दीतील हे पहिले शतकही आहे. किशनने चटगांवमध्ये खेळताना अनेक विक्रम मोडीत काढले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक झळकावणारा तो खेळाडू ठरला आहे. यामध्ये त्याने वेस्ट इंडिजचा माजी स्फोटक फलंदाज ख्रिस गेलचा विक्रम मोडला. किशन 131 चेंडूत 210 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 24 चौकार आणि 10 षटकार मारले.
किशनने 126 चेंडूत आपले द्विशतक झळकावले. ख्रिस गेलबद्दल बोलायचे झाले तर 2015 च्या विश्वचषकात त्याने झिम्बाब्वेविरुद्ध 215 धावांची खेळी खेळली होती. ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा येथे गेलने 138 चेंडूत द्विशतक झळकावले होते. वनडेत द्विशतक झळकावणारा किशन हा भारताचा चौथा फलंदाज ठरला. त्याच्या आधी सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा यांनी द्विशतके झळकावली होती. एकूण विक्रमाबद्दल बोलायचे तर दुहेरी शतक झळकावणारा तो जगातील सातवा फलंदाज आहे. वनडेतील हे नववे द्विशतक आहे. रोहित शर्मा हा एकापेक्षा जास्त द्विशतक करणारा एकमेव फलंदाज आहे. असे त्याने तीन वेळा केले आहे.
रोहितच्या दुखापतीनंतर मिळाली संधी
24 वर्षीय युवा विकेटकीपर फलंदाज ईशान किशनला आज म्हणजेच शनिवारी रोहित शर्माच्या अनुपस्थितीत पहिल्यांदाच बांगलादेशविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली. ईशानने या संधीचा पुरेपूर फायदा घेत 85 चेंडूत धडाकेबाज शतक ठोकले. शतक झळकावल्यानंतर त्याचा वेग आणखी वाढला आणि त्याने सतत चौकार-षटकारांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली. सध्या ईशान किशनने 126 चेंडूत द्विशतक झळकावले आहे.
सेहवागला मागे सोडले
ईशान किशन बांगलादेशविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडला. 2011 च्या विश्वचषकात सेहवागने बांगलादेशविरुद्ध 175 धावांची खेळी केली होती.
चार वर्षांनंतर झळकावले द्विशतक
पहिल्यांदा क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हा चमत्कार केला होता. वीरेंद्र सेहवाग दुसऱ्या, रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील शेवटचे द्विशतक 2018 मध्ये आले होते. त्यावेळी पाकिस्तानच्या फखर जमानने झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद 210 धावा केल्या होत्या.