Tuesday, July 29, 2025
Homeकोल्हापूरपीएम किसान योजनेचे काम तीन महिन्यांपासून ठप्प; योजना राबवण्याबाबत महसूल, कृषीमध्ये संभ्रम

पीएम किसान योजनेचे काम तीन महिन्यांपासून ठप्प; योजना राबवण्याबाबत महसूल, कृषीमध्ये संभ्रम


कोल्हापूर : कृषी की महसूल विभागाने यापुढे योजना राबवायची, या घोळात राज्यभरातील पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे काम गेल्या तीन महिन्यांपासून ठप्प झाले आहे. शासनस्तरावरच त्याबद्दलची स्पष्टता झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची मात्र कोंडी झाली आहे. नवी नोंदणी पूर्णत: बंदच आहे.

घडले ते असे :
ही मूळ योजना कृषी विभागाची. ती सुरू झाली २०१९मध्ये. त्याचा शासन आदेशही कृषी विभागाचाच. परंतु त्यासाठी लागणारे कागदोपत्री पुरावे महसूल विभागाशी संबंधित. पंतप्रधानांचा महत्त्वाकांक्षी योजना राबवण्याचा दबाव असल्याने महसूल खात्याने ही योजना राबवली. लॉगिन आयडी व पासवर्ड महसूल, कृषी व पंचायत समितीच्या अधिकाऱ्याच्या नावांवरच तयार झाले. महाराष्ट्रात या योजनेचे चांगले काम झाल्यामुळे कृषी आयुक्तांना त्याबद्दल पुरस्कार मिळाला. तिथे माशी शिंकली. काम महसूलचे आणि पुरस्कार कृषी विभागाला का, असा मुद्दा पुढे आला. त्यातून ही योजना कृषी विभागानेच राबवावी, असा दबाव महसूलकडून सुरू झाला.

त्यानुसार तीन महिन्यांपूर्वी मंत्रालयात बैठक झाली. त्यामध्ये जी अजून ७ लाख ९० अर्जांची पडताळणी झाली नाही ती महसूल विभागाने पूर्ण करावी आणि मग ही योजना कृषी विभागाकडे हस्तांतरित करण्याचे ठरले. परंतु, ही पडताळणीच पूर्ण झालेली नाही. त्यामुळे योजनाही कृषी विभागाकडे हस्तांतरित झालेली नाही. त्यामुळे त्यांचे लॉगिन आयडी व पासवर्ड तयार झालेले नाहीत. कृषी विभागाकडे योजना राबविण्यासाठी पुरेसा कर्मचारी नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -