पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक तितकीच डोक्यात तिडीक निर्माण करणारी घटना समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगूडमध्ये एका भोंदू डॉक्टरच्या कृत्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. तसेच एक दोन नाहीतर तब्बल चारशे महिलांसोबत या भोंदू डॉक्टरने अतिशय घृणास्पद काम केलं आहे. उपचारासाठी आलेल्या महिलांचे लैंगिक शोषण करत व्हिडिओ बनवला, सेक्स क्लिप बनवल्या. यातील सुमारे 70 ते 80 व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, सुमारे 400 महिलांनी पत्र लिहून डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी पिडित महिलांनी केली आहे. या घटनेमुळं जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
या सर्व क्लिप आरोपी डॉक्टरने स्वत: बनवल्या असल्याचे सांगण्यात येत आहे आणि जेव्हा त्या भोंदू डॉक्टरने त्याचा लॅपटॉप दुरुस्तीसाठी दिला तेव्हा हे सर्व व्हायरल झाल्या. आरोपींनी लॅपटॉपमध्ये अनेक क्लिप साठवून ठेवल्या होत्या. या क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल झाल्या असून, यातील बहुतांश स्थानिक महिला असल्याने संतापाची लाट उसळली आहे. यासोबतच पोलिसांनी याप्रकरणी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील मुरगूड येथील एक बनावट फेरीवाला गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर आपल्या व्यवसायाची जाहिरात करत होता. ही जाहिरात पाहून आजूबाजूचे अनेक लोक उपचारासाठी येत होते. याचा फायदा घेत त्याने उपचारासाठी आलेल्या महिलांसोबत अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली. त्याने मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओही बनवले होते. यामध्ये स्थानिक महिलांसह तरुणींचाही समावेश आहे. पण हे कांड पटॉप दुरुस्तीसाठी दिल्यानंतर समोर आल्यानं सर्वांना धक्का बसला आहे. तसेच या भोंदू डॉक्टरच्या कृतामुळं परिसरातील सर्व डॉक्टरांचे नाव खराब झाले आहे, पोलीस या भोंदू डॉक्टराचा शोध घेताहेत. या घटनेमुळं महिलांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
कोल्हापूर : 80 सेक्स क्लिप व्हायरल झाल्यानंतर 400 महिलांची तक्रार, महिलांसोबत डॉक्टरने केले मोठे कांड
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -