Tuesday, July 29, 2025
Homeक्रीडारोहितनंतर आता धोनीही IPL चे सामने मुकणार? समोर आली धक्कादायक माहिती

रोहितनंतर आता धोनीही IPL चे सामने मुकणार? समोर आली धक्कादायक माहिती

आयपीएलचा 16वा हंगामा सुरू होण्यासाठी आता अवघ दोन दिवस उरले आहे. त्याआधी मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा या हंगामातील सुरुवातीचे सामने खेळणार नाही. या बातमीतून चाहते कुठेतरी सावरत होते. त्यातच चेन्नई सुपर किंगच्या चाहत्यांना मोठा धक्का बसु शकतो.

2023च्या एकदिवसीय वर्ल्डकपमधून बाहेर
आयपीएलसाठी सर्व संघांनी तयारी सुरू केली असून खेळाडू आपापल्या घरच्या मैदानावर जोरदार सराव करत आहेत. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीही सराव करत आहे. सराव सत्रादरम्यान धोनी डाव्या पायाने लंगडा होताना दिसला. धोनीला पळताना अडचणी येत होती. धोनीच्या दुखापतीबद्दल कोणतीही अधिकृत पुष्टी नसली तरी, CSK साठी ही चिंतेची बाब आहे कारण चेन्नई सुपर किंग्ज 31 मार्चला त्यांच्या पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सशी होणार आहे.

धोनीचा दांडपट्टा झाला सुरू अन् चेन्नईकर झाले सैराट
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नुकत्याच झालेल्या सराव सत्रादरम्यान त्याच्या डाव्या पायात काही समस्या निर्माण झाली होती. IPL 2023 च्या पहिल्या सामन्याच्या काही दिवस आधी धोनी सराव सत्रादरम्यान लंगडताना दिसला होता. धोनीच्या दुखापतीबाबत फ्रँचायझीकडून मात्र अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -