Sunday, July 6, 2025
Homeक्रीडाIPL 2023 : दिल्लीच्या मैदानावर गुजरातची कसोटी, गुजरात विजयाचा पॅटर्न कायम ठेवणार?

IPL 2023 : दिल्लीच्या मैदानावर गुजरातची कसोटी, गुजरात विजयाचा पॅटर्न कायम ठेवणार?

आयपीएल 2023 मध्ये सातवा सामना गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्सविरोधात रंगणार आहे. हा सामना 4 एप्रिल रोजी मंगळवारी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार आहे. इंडियन प्रीमियर लीग 2023 हा च्या सातवा सामना दिल्लीच्या घरच्या मैदानावर होणार आहे. आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्स खातं उघडण्यासाठी गुजरात विरोधात मैदानात उतरणार आहे. तर, गुजरात टायटन्सचं लक्ष्य सलग दुसऱ्या विजयावर असतील.

डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सचा शनिवारी केएल राहुलच्या लखनौ सुपर जायंट्सकडून 50 धावांनी पराभव झाला. होम ग्राऊंडवर याचा बदला घेण्याचा प्रयत्न दिल्लीचा संघ करेल. दुसरीकडे, गुजरात टायटन्सने शुक्रवारी आयपीएल 2023 च्या सलामी सामन्यात धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सवर विजय मिळवला.

गुजरात टायटन्सविरुद्धच्या लढतीपूर्वी दिल्ली कॅपिटल्स त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करण्याचा प्रयत्न करेल. आता मुश्ताफिजुर रहमान दिल्ली संघात सामील झाला आहे. संघ त्यांच्या सुरुवातीच्या प्लेईंग 11 मध्ये फक्त तीन परदेशी खेळाडूंना मैदानात उतरवू शकतो आणि इम्पॅक्ट प्लेयरच्या पर्यायाच्या सेटमधून एका भारतीय खेळाडूला परदेशी पर्यायासह बदलू शकतो.

दिल्ली संभाव्य प्लेइंग 11 :
डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, ललित यादव, सरफराज खान (विकेटकीपर), रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, चेतन साकारिया, खलील अहमद, मुकेश कुमार

गुजरात संभाव्य प्लेइंग 11 :
शुभमन गिल, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, जोशुआ लिटल, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ

लाईव्ह सामना कुठे पाहाल?
स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग ‘Jio Cinema’ ॲपवर उपलब्ध असेल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -