Sunday, February 22, 2026
Homeकोल्हापूरकोल्हापूर : एसटीच्या धडकेत महिला ठार

कोल्हापूर : एसटीच्या धडकेत महिला ठार

कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर वाकरे- दोनवडे दरम्यान एसटीच्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार झाली तर पती गंभीर जखमी झाला आहे. अरूंधती बाळासाहेब पाटील (वय ४८) असे या अपघातातील मृत महिलेचे नाव आहे तर पती बाळासाहेब आकाराम पाटील (रा. कुडित्रे, ता. करवीर) हे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात दुपारी बुधवारी दुपारी साडे बाराच्या दरम्यान घडला.

घटनास्थळावरून मिळालेली प्राथमिक माहिती अशी, देवगड- तुळजापूर एसटी बस कोल्हापूरकडे निघाली होती. याचदरम्यान कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील घटना बाळासाहेब पाटील हे आपली पत्नी येथे आपल्या गावी निघाले होते. अरुंधतीसह दुचाकीवरून कुडित्रे कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर दोनवडे-वाकरे दरम्यान असलेल्या वळणावर असलेल्या तीव्र उतारावर एसटी चालकाचा बसवरील ताबा सुटला व विरुध्द दिशेला जात मोटरसायकलने येणाऱ्या या पती- पत्नीच्या अंगावर एसटी बस गेल्याने यात पत्नी अरुंधती जागेवरच ठार झाल्या, तर पती बाळासाहेब यांच्या पायाला व हाताला गंभीर जखम झाली आहे. त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटना घडल्यानंतर रस्त्यावर असणाऱ्या प्रवाशांनी तातडीने दोघा पती-पत्नींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण यात पत्नी अरुंधती पाटील यांचा उपचारापूर्वीच मृत झाल्याचे सांगण्यात आले. तर, पती बाळासाहेब पाटील गंभीर जखमी आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -