Monday, February 23, 2026
Homeसांगलीआटपाडीत विवाहित महिलेचा लॉजवर खूण , एका संशयितास अटक

आटपाडीत विवाहित महिलेचा लॉजवर खूण , एका संशयितास अटक

शहरातील एका लॉजवर खोलीत सत्तावीस वर्षीय महिलेचा खून झाल्याची घटना आज, शनिवारी उघडकीस आली. छाया मधुकर देवडकर (रा. विठ्ठलनगर, आटपाडी) असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे.
याबाबत एका संशयितास आटपाडी पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, आटपाडी बाजार समितीसमोर एक लॉज आहे. याठिकाणी गुरुवारी (दि.४) दुपारच्या सुमारास छाया देवडकर व नानासो हणमंत देवडकर (वय ३३, रा.पिंजारी वस्ती निंबवडे) हे खोली बुक करून राहिले होते. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून हॉटेल कर्मचारी यांनी दरवाजा उघडून पाहिला नाही.

शनिवारी सकाळी खोलीतून दुर्गधी वास येऊ लागल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. यावेळी खोलीचा दरवाजा उघडून पाहिला असता छाया देवडकर हिचा मृतदेह आढळून आला. दरम्यान लॉजच्या नोंदणीनुसार लॉजची खोली बुक केलेल्या नानासो देवडकर याला संशयित म्हणून आटपाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलिस करीत असून मृतदेह पुढील तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -