Thursday, July 31, 2025
Homeसांगलीसांगलीत बंद फ्लॅट फोडून भरदिवसा घरफोडी!

सांगलीत बंद फ्लॅट फोडून भरदिवसा घरफोडी!

विश्रामबाग परिसरात असणाऱ्या मीरा हाऊसिंग सोसायटी मधील एका अपार्टमेंट मधील बंद फ्लॅट भर दिवस फोडून चोरटयांनी घरफोडी केली. घरात ठेवलेले तब्बल ४ लाख ४२ हजार ५०० रुपयांचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. सदर घरफोडीची घटना हि रविवार दि. ०७ मे रोजी दुपारी १२ ते चार वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी मंगेश मुरलीधर शहा (वय ४० रा. सांगली) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, मंगेश शहा यांच्या आई उषा शहा या विश्रामबाग परिसरातील मीरा हाऊसिंग सोसायटी मधील एका अपार्टमेंट मधील फ्लॅट मध्ये एकट्याच राहतात. उषा शहा या त्यांची मैत्रीण वंदना गोरे यांच्या घरी कार्यक्रम असल्याने रविवार दि. ०७ मे रोजी शामरावनगर येथे दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गेल्या होत्या. यावेळी अज्ञात चोरट्यांनी बंद फ्लॅटवर पाळत ठेऊन दरवाजाला लावलेले कुलूप आणि कडी- कोयंडा तोडून फ्लॅट मध्ये प्रवेश केला. बेडरूम मध्ये असणाऱ्या कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे दागिने असा एकूण ४ लाख ४२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून चोरट्यांनी पलायन केले. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास शहा या घरी आल्या असता त्यांना घरचे कुलूप तुटल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आत जाऊन पहिले असता कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडले होते आणि दागिने चोरीला गेले होते.

घडलेला प्रकार त्यांनी मुलगा मंगेश यांना सांगितला. यानंतर मंगेश यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत तपासाच्या सूचना दिल्या. विश्रामबाग परिसरात वाढत्या घरफोड्यांच्या घटनांनी नागरिक त्रस्त झाले असता पोलीस काय करतात असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -