Friday, February 7, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : बंद फ्लॅटचे कुलूप उचकटून दागिन्यांसह रोकड लंपास!

कोल्हापूर : बंद फ्लॅटचे कुलूप उचकटून दागिन्यांसह रोकड लंपास!

गांधीनगर येथील  बंद फ्लॅटचे कुलूप उचकटून अज्ञात चोरट्याने गांधीनगर (ता. करवीर) येथील अक्षय संतोष हिंदुजा ( रा. महाआंबे प्लाझा, गांधीनगर) यांच्या फ्लॅटमध्ये प्रवेश करून लोखंडी कपाटातील पंधरा हजार रुपये रोख रकमेसह ८० हजार ५०० रुपयांच्या सोळा ग्रॅमच्या चार सोन्याच्या अंगठ्या व पाच हजार रुपये किंमतीचे चांदीचे पैंजण असा एक लाख पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

चोरट्याने फ्लॅटमध्ये प्रवेश केल्यानंतर लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडून लॉकर मध्ये स्टीलच्या डब्यात ठेवलेले दागिने व रोख रक्कम लंपास केली. चोरीस गेलेला मुद्देमाल असा तीस हजार पाचशे रुपये किमतीची सहा ग्रॅमची सोन्याची अंगठी, तीस हजारांच्या तीन ग्रॅमच्या दोन अंगठ्या, वीस हजार रुपयांची चार ग्रॅमची अंगठी व पाच हजार रुपये किमतीचे चांदीचे पैंजण व रोख रक्कम पंधरा हजार. असा एकूण एक लाख पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. हा चोरीचा प्रकार चार मे ते नऊ मे दरम्यान झाला. अक्षय हिंदुजा यांच्या आईचे निधन झाल्याने उत्तर कार्यानंतर त्यांनी आज शुक्रवारी गांधीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अज्ञात चोरट्यावर गुन्हा नोंद झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -