Friday, February 7, 2025
Homeब्रेकिंगअखेर तो दिवस आला… धुमधडाक्यात पार पडणार राघव-परिणीतीचा साखरपुडा!

अखेर तो दिवस आला… धुमधडाक्यात पार पडणार राघव-परिणीतीचा साखरपुडा!

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा  आणि आपचे खासदार राघव चड्ढा यांचा आज साखरपुडा होणार आहे. नवी दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये त्यांचा साखरपुडा होणार आहे. या शाही साखरपुड्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांना आजवर अनेकदा स्पॉट करण्यात आलं आहे. त्यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या होत्या. अनेक दिवस एकमेकांना डेटिंग केल्यानंतर अखेर आज त्यांच्या साखरपुड्याचा दिवस उजाडला आहे. खास थीम, प्रमुख पाहुणे, हटके लूक आणि शाही भोजन हे परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्याचं विशेष आकर्षण आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, बहिणीच्या साखरपुड्यासाठी प्रियांका चोप्रा आपला पती निक जोनस आणि मालती मेरीसह दिल्लीत येणार आहे. बॉलिवूडचा लोकप्रिय सिने-दिग्दर्शक करण जौहरदेखील या साखरपुड्याला हजेरी लावणार आहे. राघव चड्ढा यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक राजकीय मंडळीदेखील उपस्थित राहणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री  भगवंत मान यांच्या नावाचादेखील समावेश आहे. 

कुटुंबीय आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत परिणीती आणि राघव यांचा साखरपुडा होणार आहे. परिणीती-राघवसाठी आजचा दिवस खूप खास आहे. मीडिया रिपोर्टनुसार, परिणीती आणि राघव मॅचिंग आऊटफिट परिधान करणार आहेत. राघव यांचा आऊटफिट फॅशन डिझायनर पवन सचदेवा यांनी डिझाइन केला आहे. तर परिणीतीचा बॉलिवूडचा लोकप्रिय फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केला आहे. 

परिणीती आणि राघव यांच्या शाही साखरपुड्याची थामी हटके आहे. परिणीती-राघव यांच्या साखरपुड्याला येणाऱ्या मंडळींसाठी पेस्टल रंगाची थीम ठेवण्यात आली आहे. परिणीती आणि राघव यांनी त्यांचं नातं अद्याप गुलदस्त्यात ठेवलं असलं तरी त्यांच्या साखरपुड्याच्या ठिकाणाचे, तयारीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. 

शाही भोजनाचा स्पेशल मेन्यू

परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्यात येणाऱ्या पाहुण्यांसाठी खास मेजवानी असणार आहे. वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी असणार आहे. परिणीती कबाब आवडत असल्याने मेन्यूमध्ये कबाबचादेखील समावेश करण्यात आला आहे. तसेच या साखरपुड्यात शाकाहारी मंडळींसाठी शाही भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक गोड पदार्थदेखील असणार आहेत. यामध्ये नेमके कोणते पदार्थ असणार हे अद्याप समोर आलेलं नाही. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -