Sangli:उसने दिलेले अडीच लाख रुपये बहिणीच्या लग्नासाठी (Marriage) पाहिजेत, म्हणून सतत मागणी करूनही परत देण्यास टाळाटाळ केल्याने युवकाने मानसिक तणावाखाली आत्महत्या केल्याची तक्रार सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.घटना २९ एप्रिल रोजी कवलापूर येथे घडली. अक्षय जालिंदर माळी (वय २६, दत्ता मळा, कवलापूर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. अक्षयचे वडिल जालिंदर यशवंत माळी यांनी तिघांविरोधात सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यानुसार पोलिसांनी(Police) विष्णू माळी, आतिश विष्णू माळी आणि तुकाराम तोडेर (दत्त मळा, कवलापूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृत अक्षय माळी याने या तिघांना मिळून दोन लाख ५३ हजार ५०० रुपये उसने दिले होते. त्याच्या बहिणीचे लग्न (Sister marriage)असल्याने त्याने तिघांकडे दिलेले पैसे परत मागितले.परंतु त्यांनी पैसे परत देण्यास टाळाटाळ केली. यामुळे अक्षय मानसिक तणावाखाली होता. त्यातूनच त्याने गेल्या महिन्यात २९ एप्रिल रोजी सायंकाळी(Night) राहत्या घरात आत्महत्या ( Sucide)केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -