Friday, February 7, 2025
Homeअध्यात्मपाठवणीच्या वेळी नवरीच्या हातून तांदूळ का उधळतात?

पाठवणीच्या वेळी नवरीच्या हातून तांदूळ का उधळतात?

मित्रांनो लग्न म्हंटलं की दोन जीवांचे एकत्र येणे, दोन कुटुंब एकत्र येणे. त्यामुळे प्रत्येक जण हा आपल्या मुलीचे किंवा मुलाचे लग्न करीत असताना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असतात. म्हणजेच त्यांचा जोडीदार हा त्यांच्यासाठी योग्य आहे का तसेच पंचांग शास्त्रानुसार यांची मते जुळतील का अशा अनेक बाबींचा विचार केला जातो.

लग्न जमलं की दोन्ही कुटुंब खूपच आनंदी असतात. परंतु मुलीच्या माहेरचे मात्र थोडे खुश असतात तर थोडे दुखी ही असतात. कारण त्यांची मुलगी ही आता दुसऱ्या घरामध्ये जाणार म्हणजेच ती परकी होणार. लग्नामध्ये अनेक प्रकारच्या विधी, पद्धती आहेत आणि या पद्धती विधी आपल्या शास्त्रामध्ये सांगितल्या गेलेल्या आहेत आणि त्या पद्धतीनुसार त्या विधीनुसार बरेच लोक हे लग्न सोहळा पार पाडत असतात.

आजकाल लव मॅरेज भरपूर प्रमाणात चालले आहे. परंतु मित्रांनो आपल्या समाजामध्ये अजून अशी बरीचशी लोक आहेत जे आपले जे काही धर्मशास्त्रामध्ये सांगितलेले विधी, पद्धती या लग्नामध्ये करित असतातच. त्याचे काटेकोरपणे पालन देखील करीत असतात.

लग्नाची गणेश पुजनापासून सुरूवात होते. साखरपुडा, मेंदी, हळद, लग्नाचे विधी, रिसेप्शन अशा सगळ्याच गोष्टी फार आनंदी वातावरणात पार पडतात. पण शेवटी मुलीची पाठवणी करण्याचा क्षण सगळ्यांसाठीच फार भावूक क्षण असतो.

विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर जेव्हा मुलीची पाठवणी करतात. त्यावेळेस सर्वांच्या डोळ्यांमध्ये अश्रू असतात. मित्रांनो ज्यावेळेस मुलीची पाठवणी करतात त्यावेळेस पाठवणी करताना त्या मुलीने पुढे चालत मागे न बघता आपल्या हातून मागे तांदूळ उधळले जातात. परंतु यामागचे नेमके कारण काय आहे हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नाही.

मुलीने हातून उधळलेले तांदूळ हे आईने झेलावे असे मानले जाते आणि अशा पद्धती, विधी आपल्या या हिंदू धर्मामध्ये केल्या जातात. तर यामागचं कारण नेमकं काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, तांदळाला लक्ष्मीचं प्रतिक समजलं जातं. समृध्दीचं प्रतीक मानलं जातं. नवरी जाताना ते उधळते. कारण या मागे असा विश्वास असतो की, जरी तिचं लग्न झालं तरी माहेरच्या सुखसमृध्दीसाठी ती प्रार्थना करते. मुलीला लक्ष्मीचं रुप मानलं जातं.

तिची पाठवणी केली म्हणजे तिच्यासोबत माहेरची लक्ष्मी जाऊ नये. म्हणून त्याचं प्रतिकात्मक रुप तांदूळ ती उधळत जाते. एका अर्थी माहेरची लक्ष्मी तिथेच नांदू दे अशी शुभेच्छा देते.

तसेच लहानाची मोठी ज्या घरात झाली,तिथे कशाचीच कमतरता भासू नये या शुभेच्छांसह धन्यवाद करण्याचं हे माध्यम समजलं जातं. तांदूळ समृध्दीचं प्रतीक आहे आणि जेवणाचाही घटक आहे. त्यामुळे माहेरी अन्नाची कमतरता भासू नये अशी मनोकामना करत मुलगी सारसरच्या वाटेने निघते.

तर मित्रांनो याच कारणामुळे जेव्हा मुलीची लग्नामध्ये पाठवनी करीत असताना मुलीला मागे न बघता आपल्या हाताने तांदूळ उधळले जातात आणि तेच तांदूळ तिच्या आईने झेलायचे असतात.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -