Friday, February 7, 2025
Homeक्रीडाCSK vs GT: पाऊस थांबलाच नाही तर? 'रिझर्व डे' बाबत अधिकृत माहिती...

CSK vs GT: पाऊस थांबलाच नाही तर? ‘रिझर्व डे’ बाबत अधिकृत माहिती समोर!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

आयपीएल 16 व्या मोसमातील अंतिम मॅचआधी अहमदाबादमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएलचा फायनल (IPL 2023 Final) सामना खेळवला जात आहे. मात्र, सामन्याआधी जोरदार पावसाला सुरूवात झाल्याने चाहत्यांची चिंता वाढली आहे. जर आज सामना झाला नाही तर काय होणार? यावर आता अधिकृत माहिती समोर आली आहे.

जर पावसामुळे आज सामना झाला नाही तर उद्याचा रिझर्व डे असणार आहे. याचाच अर्थ, उद्या म्हणजेच 29 मे रोजी सामना खेळवला जाईल, अशी माहिती स्टार स्पोटर्सने दिली आहे.

साधारण 12.50 पर्यंतचं वेळ असतो. पाऊस थांबला तर किमान 5-5 ओव्हरचा खेळ होईल. त्यावेळेपर्यंत सामना जर सुरू झाला नाही तर रिझर्व डे असणार आहे, अशी माहिती मराठी समालोचक चैतन्य संत यांनी झी 24 ताससोबत बोलताना दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -