Thursday, November 27, 2025
Homeब्रेकिंगशेतकऱ्यांना 1 रुपयात पिक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा, ‘या’ 5 प्रकारच्या नुकसानीत...

शेतकऱ्यांना 1 रुपयात पिक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा, ‘या’ 5 प्रकारच्या नुकसानीत मिळेल भरपाई

पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना असून अतिवृष्टी, अवकाळी पाऊस तसेच गारपीटी सारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये शेती पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई या योजनेच्या माध्यमातून मिळते. परंतु मध्यंतरी कालावधीमध्ये विमा कंपन्यांकडून विमा भरपाई देण्यास टाळाटाळ किंवा उशीर आणि इतर कारणामुळे शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवल्याचे चित्र होते.

या पार्श्वभूमीवर राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विम्याची घोषणा केली होती. परंतु घोषणा झाल्यानंतर त्याचा जीआर अर्थात शासन निर्णय काढण्यात आलेला नव्हता. परंतु आता राज्य शासनाने याबाबतचा शासन निर्णय काढला असून शेतकऱ्यांना आता एक रुपयात पीक विमा चा लाभ मिळणार आहे.राज्य शासनाने काढला जीआर

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विम्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. परंतु घोषणेनंतर मात्र याबाबतचा शासन निर्णय अद्याप पर्यंत राज्य शासनाने काढलेला नव्हता. त्यामुळे यावर विरोधी पक्षांनी टिका केल्यानंतर राज्य शासनाने यासंबंधीचा शासन निर्णय काढला असून आता शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी ट्विटच्या माध्यमातून याबाबतीत सरकारवर टीका केलेली होती. खरीप हंगाम तोंडावर आला असून पेरण्यांना सुरुवात झालेली आहे. तसेच खरीप हंगामातील अनेक पिकांच्या विम्याची रक्कम भरण्याची मुदत देखील संपलेली आहे. त्यासोबतच काही पिकांची विमा भरण्याची मुदत संपत आलेली असताना देखील शासनाने याबाबत निर्णय घेतलेला नव्हता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -