तंत्रज्ञानाच्या सर्व गोष्टी सुलभ होत असल्या तरी फसवणुकीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. ऑनलाईन माध्यमातून फसवणूक होत असल्याने स्थानिक पोलीसही हतबल आहेत. तंत्रज्ञानाबाबत तितकी माहिती नसल्याने अकार्यक्षमता दिसून येत आहे. त्यामुळे आपल्यासोबत काही चुकीची घटना घडू नये यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत आहे. असं असताना गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सॲपवर अनोळखी नंबर्सवरून कॉल येण्याचा घटना वाढल्या आहेत. आपला नंबर त्यांच्याकडे कसा आला याबाबतही अनेकांना प्रश्न पडला आहे.
हे कॉल भारतातून नाही तर इतर देशांच्या कोडसह येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. काही जण वर्च्युअल नंबर्सच्या माध्यमातूनही लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहे.दर दोन दिवसांनी +92, +82, +62 या कोडवरून फोन येत आहेत. त्यामुळे युजर्संमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी एका युजर्सला +92 या नंबरवरून कॉल आला होता. यात फुकटात आयफोन 14 जिंकण्याबाबत सांगण्यात आलं होतं. त्यांनी दिलेल्या स्किममध्ये अडकल्यानंतर त्याला लाखो रुपये गमवण्याची वेळ आली. त्यामुळे शेवटी पोलिसांकडे धाव घेण्याशिवाय पर्याय नव्हता. अशा अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत. त्यामुळे व्हॉट्सॲपने असे कॉल ब्लॉक करण्याचा सल्ला दिला आहे.
नेमके कुठून येत आहेत कॉल्स?
व्हॉट्सॲपने याबाबत माहिती देताना सांगितलं आहे की, युजर्संना मलेशिया, केनिया, वियतनाम आणि इथोपिया येथून आयएसडी कॉल्स येत आहेत. या काल्समागे नेमकं काय प्रकरण आहे हे मात्र उघड नाही. पण या माध्यमातून फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. इतकंच काय तर कॉल्स अवघ्या काही सेकंदात कट होत आहे. त्यामुळे त्यावर पुन्हा कॉल करण्याच्या भानगडीत पडू नका. अन्यथा फसवणूक होऊ शकते.कसे कराल हे अनोळखी कॉल्स बंद
व्हॉट्सॲपने सांगितलं की, “आम्ही युजर्संना सुरक्षा देण्यासाठी प्रतिबद्ध आहोत. यासाठी आम्ही एआय आणि इतर तंत्रज्ञानांची मदत घेत आहोत.” मार्च महिन्यात कंपनीने 47 लाख अकाउंट्स बंद केले आहेत. त्याचबरोबर कंपनी अनोळखी नंबर्स कॉल्स सायलेंट करण्यासाठी एक फीचर्स दिलं आहे.असे कराल अनोळखी कॉल्स सायलेंट
व्हॉट्सॲप ओपन करा आणि त्याच्या सेटिंगमध्ये जा. तिथे गेल्यानंतर प्रायव्हसी हे ऑप्शन निवडा आणि कॉल्स ऑप्शनवर जा. या ठिकाणी तुम्हाला Silent Unknown Calls हा पर्याय मिळेल. येथे दिलेला टॉगल ऑन करा तेव्हा ते ग्रीन दिसेल. म्हणजेच तुमचं काम झालं असं समजा.