Sunday, August 3, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापुरात महालक्ष्मी देवीचा अवभृत स्नान सोहळा उत्साहात

कोल्हापुरात महालक्ष्मी देवीचा अवभृत स्नान सोहळा उत्साहात

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ असलेल्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचा अवभृत स्नान सोहळा शनिवारी पंचगंगा नदीमध्ये संपन्न झाला.अधिक श्रावण मासानिमित्त धार्मिक अनुष्ठान समाप्तीनंतर आज सकाळी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीची उत्सव मूर्ती पालखीतून शाही लवाजम्यासह पंचगंगा नदीकडे रवाना झाली. यानंतर नदीमध्ये श्री महालक्ष्मी देवीचा विधिवत अवभृत स्नान सोहळा पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी या ठिकाणी अंबामातेच्या भक्तांनी मोठी गर्दी केली होती.

मंगलमय वातावरणपारंपारिक वाद्यांच्या गजरासह सनई चौघड्यांच्या तालात मिरवणूक मार्गावर प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते. पालखी मार्गावर जागोजागी फुलांच्या पायघड्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. पंचगंगा नदीवर विविध धार्मिक विधीनंतर श्री देवीची पालखी पुन्हा मंदिराकडे मार्गस्थ झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -