Tuesday, July 29, 2025
Homeब्रेकिंगआनंदाची बातमी; 4082 घरांसाठीची सोडत, हक्काच्या घराची चावी कोणाला मिळणार?

आनंदाची बातमी; 4082 घरांसाठीची सोडत, हक्काच्या घराची चावी कोणाला मिळणार?

ताजी बातमी ऑनलाईन टीम

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 4 हजार 82 घरांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोमवारी सोडत काढण्यात येणार आहे. नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दुपारी 2 वाजता सोडत जाहीर होणार आहे. या सोडतीत तब्बल एक लाख 20 हजार 144 अर्जदार सहभागी होणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांकडून वेळ मिळत नसल्याने सोडत सोहळ्याची तारीख जाहीर होत नव्हती. त्यामुळे या सोडतीचा निकाल रखडला होता. मात्र गेल्या आठवड्यात गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी 14 ऑगस्टला सोडत जाहीर करण्याची घोषणा केली होती.

तब्बल चार वर्षांनी मुंबईतील म्हाडाच्या घरांसाठी सोडत काढण्यात येणार असल्याने यासाठी चांगला प्रतिसाद मिळाला होता. 4,082 घरांसाठी तब्बल एक लाख 20 हजार 144 जणांनी अर्ज केला होता. त्याची सोडत आज अखेर जाहीर होणार आहे. नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही सोडत निघणार आहे. दुपारी 2 वाजता सोडतीचा आरंभ होईल. महत्त्वाची बाब म्हणजे ताडदेवमधील सात कोटी किमतींच्या घरांसाठीच्या स्पर्धेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराडही आहेत. त्यामुळे या सोडतीकडे सगळ्यांचेच लक्ष्य लागलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -