राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर स्थिरस्थावर होताच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगलीत लक्ष घालून गटबांधणी सुरू केली आहे. पक्ष बांधणी करीत असताना एकीकडे अख्खा पक्ष थोरल्या पवार साहेबासोबत पर्यायाने आपल्या पाठीशी असल्याचे सांगणार्या प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना शह देत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटालाही शह देण्याचा प्रयत्न दिसतो आहे.विट्याचे वैभव पाटील यांना सोबत घेउन आमदार अनिल बाबर यांच्या पारंपारिक विरोधकांना ताकद देण्याचा चाललेला प्रयत्न हा त्याचाच एक भाग म्हणता येईल.
जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ असल्याने आणि राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या पाठीशी असल्याचे दर्शविण्यात प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील प्रारंभीच्या काळात यशस्वी ठरले असले तरी आता गळती सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. माजी महापौर दिग्विजय सुर्यवंशी, विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, पक्षाचे सांगली विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे आदींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे द्विधा मनस्थितीत असलेल्या आमदार जयंत पाटलांना एक प्रकारचा इशाराच मानला जात असून ही गळती यापुढेही सुरूच राहण्याची चिन्हे आहेत.
जयंत पाटील यांना शह देण्याकरिता अजित पवारांची सांगलीकडे नजर
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -