ताजी बातमी ऑनलाईन टीम
नवाजुद्दीन सिद्दीकी हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर त्याची एक्स पत्नी आलिया सिद्दीकी हिने गंभीर आरोप केले. यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का हा बसला. कारण नवाजुद्दीन सिद्दीकी याची पत्नी सतत त्याच्यावर आरोप करताना दिसली. इतकेच नाही तर नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या पत्नीचा वाद थेट कोर्टात पोहचला. नवाजुद्दीन सिद्दीकी याने आपल्याला घराबाहेर काढल्याचे देखील आलिया हिने म्हटले.
नवाजुद्दीन सिद्दीकी याची पत्नी आलिया ही बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये सहभागी झाली. मात्र, आलिया हिला धमाकेदार गेम खेळण्यात यश मिळाले नाही. काही दिवसांमध्ये आलिया ही बिग बाॅस ओटीटीमधून बाहेर पडली. काही दिवसांपूर्वीच आलिया सिद्दीकी हिने नवाजुद्दीन सिद्दीकी आणि तिच्या मुलीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.
आता नवाजुद्दीन सिद्दीकी याची एक्स पत्नी आलिया ही मोठ्या अडचणीत सापडली आहे. थेट दुबई सोडण्याची वेळ ही नवाजुद्दीन सिद्दीकी हिच्यावर आल्याचे बघायला मिळत आहे. आलिया हिला दुबईच्या सरकारने एक नोटीस दिलीये. यामुळे नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या पत्नीच्या समस्यांमध्ये मोठी वाढ होणार असल्याचे स्पष्ट आहे.
रिपोर्टनुसार, आलिया हिला दुबईमध्ये राहण्यासाठी 27,183.00 रूपये दर महिन्याला भरावे लागणार आहेत. जर आलिया हिने तसे नाही केले तर तिला दुबईमध्ये कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. आता कदाचित आलिया ही भारतीय दूतावासांकडे मदत मागू शकते. कायदेशीर गोष्टींमुळे यावेळी नवाजुद्दीन सिद्दीकी हा देखील आलियाची मदत करू शकत नाहीये.
नवाजुद्दीन सिद्दीकी आता यासंदर्भात आलिया हिची कशाप्रकारे मदत करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. आलिया हिने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये आलिया ही नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या घराबाहेर मध्यरात्री दिसल होती. आलिया हिने म्हटले होते की, मला आणि माझ्या मुलांना नवाजुद्दीन सिद्दीकी याने घराबाहेर काढले आहे आणि मी कुठे जाऊ हेच मला कळत नाहीये.
नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या एक्स पत्नीच्या समस्यांमध्ये मोठी वाढ, दुबईमध्ये अडकली थेट ‘या’ प्रकरणात
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -