Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगटाटांचा नवा IPO लवकरत बाजारात येणार, शेअर मार्केटचे सर्व रेकॉर्ड मोडणार?

टाटांचा नवा IPO लवकरत बाजारात येणार, शेअर मार्केटचे सर्व रेकॉर्ड मोडणार?

टाटा (TATA) म्हणजे विश्वास… हे समिकरण संपूर्ण देशभरात दृढ झालं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून टाटा समूह (TATA Group) देशभरात सक्रिय आहे. देशभरातील सर्वसामान्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग म्हणजे, टाटा. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. देशात शोधूनही कोणी असं सापडणार नाही, ज्यानं आपल्या आयुष्यात एकदाही टाटा समुहाचं काही वापरलेलं नसेल. रोजच्या स्वयंपाकात वापरल्या जाणार्‍या मिठापासून ते अनेक मोठी कामं हाताळण्यासाठी वापरली जाणारी साधनं, तर अगदी सॉफ्टवेअरपर्यंत यांसारख्या अनेक गोष्टींवर टाटा समुहाची मोहोर दिसते. टाटानं आपल्या शंभर वर्षांहून अधिक जुन्या इतिहासात अनेक मोठी कामगिरी केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आता हा समूह शेअर बाजारात असा विक्रम रचणार आहे, जो यापूर्वी कधीही झाला19 वर्षापूर्वी आलेला IPO

टाटा समूह लवकरच आपला आयपीओ बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. टाटा समुहाचे अनेक शेअर्स आधीच शेअर बाजारात लिस्टेड आहेत. यापूर्वी साधारणतः दोन दशकांपूर्वी टाटा समुहाचा आयपीओ बाजारात आला होता. त्यावेळी टाटा समुहाची आयटी कंपनी आणि TCS बाजारात आली होती. त्यानंतर आता टाटा समूह नव्या आयपीओसह बाजारात उतरण्याच्या तयारीत आहे. सध्या टाटा टेक्नॉलॉजीजच्या नावानं अनेक महिन्यांपासून टाटाच्या आयपीओची चर्चा सुरू आहे. दरम्यान, अलीकडील नियामक बदलांमुळे टाटा समूहाच्या आणखी एका आयपीओचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

रिझर्व्ह बँकेमुळे टाटा नवा IPO आणणार

आता टाटा समुहाकडून येणारा नवा IPO हा समुहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्सचा असणार आहे. रिझर्व्ह बँकेनं नियमांमध्ये काही बदल केले आहेत. या बदलांनुसार, रिझर्व्ह बँकेनं टाटा सन्सला अप्पर लेयरवरील NBFC च्या कॅटेगरीत टाकलं आहे. टाटा सन्स कॅटेगरायजेशन टाळण्यासाठी पर्याय शोधत आहे. या प्रकरणात सर्वात सोपा पर्याय म्हणजे, बाजारात लिस्ट होणं. टाटा सन्सनं बाजारात सूचिबद्ध होण्याचा निर्णय घेतल्यास, त्यासाठी आयपीओ लॉन्च करावा लागेल.

 

टाटांच्या आयपीओचं साईज काय असेल?

सध्याच्या नियमांनुसार, टाटा सन्सला बाजारात लिस्टेड होण्यासाठी 2 वर्षांचा कालावधी आहे. म्हणजे, टाटा सन्सला सप्टेंबर 2025 पूर्वी आयपीओ आणावा लागेल. सध्या टाटा सन्सची वॅल्यू अंदाजे 11 लाख कोटी रुपये आहे. आयपीओ आल्यास टाटा ट्रस्टसह टाटा सन्सच्या विविध भागधारकांना त्यांचा हिस्सा 5 टक्क्यांनी कमी करावा लागेल. सध्या टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्टची सर्वाधिक 66 टक्के भागीदारी आहे. त्यानुसार कॅलक्युलेट केल्यास 5 टक्के होल्डिंगसह IPO चं मूल्य सुमारे 55 हजार कोटी रुपये होतं. LIC च्या नावे हा रेकॉर्ड

आतापर्यंत भारतीय बाजारपेठेत एवढ्या मोठ्या आकाराचा एकही IPO आलेला नाही. भारतीय बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठ्या IPO चा विक्रम सध्या सरकारी विमा कंपनी LIC कडे आहे. LIC नं गेल्या वर्षी 21 हजार कोटी रुपयांचा IPO आणला होता, जो भारतीय बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO होता. याआधी हा विक्रम पेटीएमच्या नावावर होता.

 

भारतीय बाजारातील सर्वात मोठे IPO

LIC : 2022: 21 हजार कोटी रुपये

पेटीएम (One97 Communications) : 2021: 18,300 कोटी रुपये

कोल इंडिया : 2010: 15,200 कोटी रुपये

रिलायंस पावर : 2008: 11,700 कोटी रुपये

जीआईसी : 2017: 11,257 कोटी रुपये

 

टाटा समुहाच्या सध्याच्या शेअर्सची संपूर्ण यादी

टाटा कंसल्टंसी लिमिटेड (Tata Consultancy Services Limited)

टाटा स्टील (Tata Steel Limited)

टाटा मोटर्स (Tata Motors Limited)

टाइटन (Titan Company Limited)

टाटा केमिकल्स (Tata Chemicals Limited)

टाटा पावर (The Tata Power Company Limited)

इंडियन होटल्स कंपनी (The Indian Hotels Company Limited)

टाटा कंज्यूमर प्रोडक्ट्स (Tata Consumer Products Limited)

टाटा कम्यूनिकेशंस (Tata Communications Limited)

वोल्टास (Voltas Limited)

ट्रेंट (Trent Limited)

टाटा स्टील लॉन्ग प्रोडक्ट्स (Tata Steel Long Products Limited)

टाटा इन्वेस्टमेंट कॉरपोरेशन (Tata Investment Corporation Limited)

टाटा मेटालिक्स (Tata Metaliks Limited)

टाटा एलक्सी (Tata Elxsi Limited)

नेल्को (Nelco Limited)

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -