Wednesday, February 11, 2026
Homeमहाराष्ट्रPAN नियमांमध्ये मोठे बदल! बँक, गाडी, लग्न खर्च आणि घर व्यवहारांमध्ये कुठे...

PAN नियमांमध्ये मोठे बदल! बँक, गाडी, लग्न खर्च आणि घर व्यवहारांमध्ये कुठे लागणार PAN, कुठे नाही? जाणून घ्या

देशातील करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. आयकर विभागाने 2026 साठी तयार केलेल्या ड्राफ्ट नियमांमध्ये PAN कार्डसंदर्भातील अनेक महत्त्वाचे बदल सुचवले आहेत.

 

हे नवीन नियम 1 एप्रिल 2026 पासून लागू होण्याची शक्यता असून, अनेक आर्थिक व्यवहारांमध्ये PAN देण्याच्या मर्यादा नव्याने निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

 

बँकेचे नियम बदलले

 

आतापर्यंत बँकेत एका दिवसात 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रोख व्यवहार करताना PAN देणे बंधनकारक होते. मात्र आता ‘दिवस’ऐवजी ‘संपूर्ण आर्थिक वर्ष’ हा निकष लागू केला जाणार आहे. प्रस्तावानुसार, एका वर्षात एक किंवा अधिक खात्यांमधून एकूण 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रोख जमा किंवा काढल्यासच PAN आवश्यक राहील. छोट्या व्यवहारांसाठी यामुळे प्रक्रिया सोपी होणार आहे.

 

वाहन खरेदी करताना पॅनची गरज?

 

सध्या कोणत्याही किमतीचे वाहन खरेदी करताना PAN देणे बंधनकारक आहे. नवीन नियमांनुसार, केवळ 5 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वाहनांसाठीच PAN आवश्यक असेल. दुचाकी किंवा कमी किमतीच्या गाड्यांसाठी ही अट लागू होणार नाही, त्यामुळे मध्यमवर्गीय ग्राहकांना फायदा होईल.

 

हॉटेल आणि कार्यक्रम खर्चासाठी PAN ची गरज?

 

लग्न, समारंभ किंवा मोठ्या कार्यक्रमांसाठी हॉटेल, बँक्वेट हॉल किंवा इव्हेंट मॅनेजमेंट सेवांवर खर्च करताना सध्या 50 हजार रुपयांपेक्षा जास्त बिलावर PAN द्यावा लागतो. ही मर्यादा वाढवून 1 लाख रुपये करण्यात येणार आहे.

 

प्रॉपर्टी खरेदीसाठी PAN चा नियम

 

जमीन किंवा घर खरेदी-विक्रीसारख्या व्यवहारांमध्ये PAN देण्याची मर्यादा 10 लाखांवरून 20 लाख रुपयांपर्यंत वाढवली जाणार आहे. छोट्या व्यवहारांवरील कागदोपत्री त्रास कमी होईल, तर मोठ्या व्यवहारांवर सरकारची नजर राहील.

 

विमा पॉलिसीसाठी PAN अनिवार्य

 

विमा कंपन्यांमध्ये खाते उघडताना आता PAN देणे बंधनकारक असणार आहे. याआधी केवळ ठराविक प्रीमियमपेक्षा जास्त रकमेवरच ही अट होती. मात्र आता सराव विमा पॉलिसीसाठी PAN कार्ड द्यावे लागणार आहे.

 

PAN बाबतच्या या नवीन नियमांबाबत केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून हे नियम अंतिम करणार आहे. यामागे सरकारचा उद्देश हा मोठ्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता वाढवणे आणि करचुकवेगिरी रोखणे आहे. त्यामुळे नागरिकांनी नवीन नियमांची माहिती घेऊन आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणे गरजेचे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -