भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. शुभमन गिलला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, वर्ल्ड कपमध्ये तो टीम इंडियासाठी कोणता सामना खेळणार? सध्या बीसीसीआयने याबाबत कोणतीही अपडेट दिलेली नाही.शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुभमन गिल 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळू शकला नाही. डेंग्यूची लागण झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून गिलला चेन्नई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहेत. गिलच्या प्लेटलेटचे प्रमाण कमी झाले होते.तो कोणत्या सामन्यासाठी तंदुरुस्त होईल की नाही हे अद्याप सांगता येणार नाही. अशा स्थितीत टीम इंडियाच्या विश्वचषक मोहिमेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.6ऑक्टोबर रोजीच शुभमन गिलची डेंग्यू चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली होती. अशा स्थितीत 8 ऑक्टोबर रोजी झालेल्या पहिल्या सामन्यात तो खेळू शकला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात गिलच्या जागी ईशान किशनला सलामीसाठी मैदानात उतरवण्यात आले होते. यावेळी सलामीला आलेला ईशान 0 धावांवर बाद झाला. अफगाणिस्तानविरुद्धही केवळ इशानला संधी दिली जाऊ शकते.शुभमन गिलने 35 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यात त्याने आतापर्यंत 66.10 च्या सरासरीने आणि 102.84 च्या स्ट्राइक रेटने 1917 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 6 शतके आणि 9 अर्धशतके आहेत.