कोरोना (Covid-19) महामारीच्या संकटात जगभरातील बहुतांश देश होरपळून निघाले असताना एक धक्कदायक माहिती उजेडात आली आहे. कोरोनाच्या विळख्यात (Coronavirus) सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी गेलेल्या जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO च्या कर्मचाऱ्यांनी तरुणी-महिलांचं लैंगिक शोषण केल्याचं समोर आलं आहे. एक चौकशीत हे भयावह वास्तव समोर आल्यानंतर WHO प्रमुख टेड्रोस एडनम घेब्रेयेसस यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच दोषींना कठोर शिक्षा व्हायला हवी, असंही त्यांनी म्हटलं आहे
आजतक (aajtak.in) वृत्तवाहिनीच्या वेबसाईटनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, WHO च्या (World Health Organization) तब्बल 21 कर्मचाऱ्यांनी कांगोमधील (Cango) पीडित अल्पवयीन मुली आणि महिलांना आपल्या वासनेची बलात्कार केली आहे. आफ्रिकन देशांमध्ये 2018 ते 2020 दरम्यान हा संतापजनक प्रकार घडला आहे. WHO चे कर्मचारी इबोला महामारीविरुद्ध लढणाऱ्या नागरिकांच्या मदतीसाठी गेले होते. तिथे त्यांनी नागरिकांच्या असह्यतेचा फायदा घेतला. अनेक तरुणी- महिलांवर त्यांनी बलात्कार केला
मीडिया रिपोर्टनुसार, हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या 50 हून जास्त महिला-तरुणींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. नराधमांमध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या तब्बल 21 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
महिलांना दिलं गुंगीचं औषध…
कांगोमधील महिलांनी याबाबत आपबिती कथन केल्यानंतर या घटनेला वाचा फुटली. काही महिलांनी गुंगीचं औषध देऊन तर काही महिलांनी नोकरी देण्याचं आमिष दाखवून त्यांचं Who च्या कर्मचाऱ्यांनी लैंगिक शोषण केलं. नराधमांकडून पीडित महिलांना गर्भपात करण्यासाठी धमकावण्यात येत असल्याची देखील माहिती समोर आली आहे.
काय म्हणाले WHO चे प्रमुख?
Whoचे प्रमुख टेड्रोस एडनम घेब्रेयेसस यांनी या प्रकाराचा निषेध केला आहे. WHO नं कांगोमध्ये काही कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आलं होतं. कर्मचाऱ्यांनी पीडित नागरिकांची सेवा करणं अपेक्षित होतं. पण, त्यांनी केलेलं कृत्य अत्यंत घृणास्पद असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, इबोला महामारीमुळे कांगोमध्ये 2000 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
मदतीसाठी आलेल्या WHO च्या कर्मचाऱ्यांनीच केलं तरुणी-महिलांचं लैंगिक शोषण
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -






