Saturday, July 5, 2025
Homeसांगलीसांगलीत मुलगी झाल्याच्या कारणातून विवाहितेचा छळ : पतीसह चौघांवर गुन्हा

सांगलीत मुलगी झाल्याच्या कारणातून विवाहितेचा छळ : पतीसह चौघांवर गुन्हा

ताजी बातमी ऑनलाईन टीम

शहरात राहणान्या विवाहितेचा किरकोळ कारणातून मानसिक आणि शारीरिक छळ करून जाचहाट केल्याची घटना घडली. या प्रकरणी पीडित महिलेने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पतीसह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. पती अविनाश हणमंत माने (रा. वारणाली), सासू सौ. सुनीता हणमंत माने (रा. आगळगाव, ता. कवठेमहांकाळ), बहिण सौ अश्विनी सागर मिसे (रा. संगमनेर, जि. अहमदनगर), मावशी सौ. चंपाबाई रेवाप्पा होवाळे (रा. कवलापूर, ता. मिरज) अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघा संशयितांची नावे आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, पीडित महिलेचे माहेर हे मिरज तालुक्यातील आहे. संशयित पती अविनाश माने याच्यासोबत पीडितेच्या विवाह झाला होता. विवाहानंतर पतीसह संशयितांनी संगनमत करून अपमानास्पद वागणूक देण्यास सुरवात केली. मुलगी झाली म्हणून पीडित महिलेला वारंवार त्रास दिला. सतत्या मानसिक त्रासाला कंटाळून पीडितेने अखेर सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी छळ करणाऱ्या पतीसह संशयित चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -