ताजी बातमी ऑनलाईन टीम
राज्यात मराठा आंदोलनाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. मनोज जरांगे हे सध्या अनेक ठिकाणचा दौरा करत असून यानिमित्ताने मराठा आरक्षणाची मागणी जोर धरत आहे. यादरम्यान केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या अमृत कलश यात्रेत मराठा आंदोलकांनी गोंधळ घातला आहे. नाशिकमधील नांदगाव येथे कार्यक्रम सुरु असताना आंदोलकांनी त्यात गोंधळ घातला. यावेळी भारती पवार यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
केंद्रीय मंत्री भारती पवार यांचा नाशिकमधील नांदगावात कार्यक्रम सुरु होता. अमृत कलश यात्रेनिमित्त त्या भाषण करत असतानाच मराठा आंदोलकांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. मराठा आंदोलकांनी आधी आमच्याशी बोला असा आग्रह धरला. यादरम्यान व्यासपीठासमोर ‘एक मराठा लाख मराठा ‘ अशी घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर भारती पवारांनी व्यासपीठावरूनच आंदोलकांचे कान टोचले. शहिदांच्या स्मरणार्थ होणाऱ्या या कार्यक्रमात गोंधळ घालणं चुकीचं असल्याचं त्या म्हणाल्या. पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.
रावसाहेब दानवेंच्या कार्यक्रमातही गोंधळ
याआधी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कार्यक्रमातही मराठा आंदोलक (Maratha आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. बदनापूरमध्ये ‘मेरी माटी मेरा देश’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल होतं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (RaoSaheb Danve) आणि मंत्री अतुल सावे यांनी उपस्थिती लावली. मात्र मराठा आंदोलकाने आत्महत्या केली असल्याने हा कार्यक्रम करू नये अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर समज देत सोडलं. आरक्षण मिळेपर्यंत एकही शासकीय कार्यक्रम होऊ देणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
केंद्रीय मंत्री भारती पवारांच्या कार्यक्रमात मराठा आंदोलकांचा गोंधळ
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -