ताजी बातमी ऑनलाईन टीम
हालसवडे येथे शेतीच्या वादातून शनिवारी रात्री झालेल्या मारामारी मध्ये कुऱ्हाडीचे घाव वम्री लागल्याने श्रीमंत पांडुरंग कांबळे (वय 51 ) हे जागीच ठार झाले. तर विनोद देसाई व ऋतुराज कांबळे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत गोकुळ शिरगाव पोलिसांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार हालसवडे येथील गट नंबर 517 मधील शेतजमणीच्या वाटणीवरून वाद सुरू होता. याच कारणावरुन शनिवारी रात्री अकराच्या सुमारास त्यांच्यामध्ये शिवीगाळ व हाणामारी चालू झाली . दशरथ रुद्राप्पा कांबळे, मोहन दशरथ कांबळे, रघुनाथ दशरथ कांबळे, साहिल रघुनाथ कांबळे, वैभव नामदेव कांबळे सर्व रा. हलसवडे या पाच जणांनी मिळून झाडाच्या छाटलेल्या फांद्या, फरशीच्या कुराडी या हत्यारांनी यांच्या पोटावर,छातीवर, खांद्यावर वार केल्याने यामध्ये श्रीमंत कांबळे हे जागीच ठार झाले. तर विनोद व ऋतुराज गंभीर जखमी झाले आहेत, या घटने बाबतीत या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून याची फिर्याद जखमी ऋतुराज श्रीमंत कांबळे यांनी रविवारी सकाळी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेचा अधिक तपास गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सपोनी डी. एम. गायकवाड करत आहेत.
कोल्हापूर ; शेतजमणीच्या वादातून एकाचा खून, तर दोन गंभीर जखमी
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -