Saturday, August 2, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर ; सतेज पाटील यांचा प्रत्येककामात मीपणा ....

कोल्हापूर ; सतेज पाटील यांचा प्रत्येककामात मीपणा ….

ताजी बातमी ऑनलाईन टीम

प्रत्येक कामात मी… मीपणा दाखवणाऱ्यांना कोल्हापूरची जनता धडा शिकवेल अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर केली आहे. गेले काही दिवसापासून कोल्हापूरच्या थेट पाईपलाईनच्या श्रेयवादाने राजकिय धुरळा उडत असताना सतेज पाटील गटाने दिलेल्या प्रतिक्रियेवर राजेश क्षीरसागर यांनी सतेज पाटील यांना लक्ष केले.

काँग्रेस आघाडी सरकारने कोल्हापूरला स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळण्यासाठी काळम्मावाडीतून थेट पाइपलाइनची योजना आखली. या योजनेचे काम येत्या नोव्हेंबर महिन्यात पूर्णत्वास जाणार असून राजकिय पक्षांकडून नागरिकांना दिवाळीची अंघोळ थेटपाईपलाईनेच घालणार असल्याची विधाने केली जात आहेत.
दरम्याने, 2024 च्या निवडणुकांच्या आधी थेट पाइपलाइनच्या मुद्दयावरून श्रेयवादासाठी राजकिय लढाई सुरू झाली आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील गटाने थेट शिंदे- फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. भाजपच्या मिशन नरेंद्र मोदी 2024 या पेजवरून पोस्ट व्हायरल झाल्यानंतर श्रेयवादाचे युद्ध सुरू झाले आहे. या पोस्टला सतेज पाटील समर्थकांनी उत्तर दिले आहे. ‘आयत्या बिळावर नागोबा’ असे म्हणत 2014 पासून ते आतापर्यंत आमदार सतेज पाटील यांनी थेट पाइपलाइनसाठी पाठपुरावा केला, अशा शब्दातं उत्तर दिले आहे.


यावर बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सतेज पाटील यांच्यावर टीका केली आहे. एखाद्या विकास कामांमध्ये ज्या लोकांचे श्रेय आहे त्या लोकांना श्रेय देणे गरजेचे आहे. वारंवार मीपणा करणे योग्य नाही. मी…. मी करणाऱ्याला कोल्हापूरची जनता धडा शिकवते अशी टीका क्षीरसागर यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -