ताजी बातमी ऑनलाईन टीम
इचलकरंजी येथील गावभाग पोलिस ठाण्यात रविवारी दुपारच्या सुमारास हमरीतुमरी होऊन पोलिसालाच धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला असल्याची चर्चा सुरू आहे. या प्रकारामुळे पोलिस ठाणे आवारात चांगलीच नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. सदरचा प्रकार आर्थिक देवघेवीच्या कारणातून झाला असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, या प्रकाराबाबत पोलिसाकडून प्रसारमाध्यमांना माहिती देण्यात
आली नाही.
याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी, येथील गावभाग पोलिस ठाण्यात अचानक रविवारी दुपारच्या सुमारास नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिस ठाण्यात ड्युटीवर असणाऱ्या एका कर्मचाऱ्याला जमावातील काही लोकांनी बोलावून घेतले. धक्काबुक्की करत त्याच्या अंगावर धावून गेले. पोलिस कर्मचाऱ्याला हमरीतुमरी होत असल्याचे लक्षात येताच अन्य पोलिस कर्मचारी धावून आले. पोलिसाला जमावाच्या तावडीतून बाहेर काढत सुटका करण्यात आली. जमावाला पांगवत पोलिस ठाण्याच्या बाहेर काढले. संबंधित पोलिस कर्मचारी व जमाव एकाच समाजाचे असून पैसे देवघेवीकरून हा प्रकार घडल्याची चर्चा पोलिस ठाण्याच्या आवारात सुरू होती. पोलिस ठाण्याकडून मात्र घडलेल्या प्रकाराची माहिती देण्यात
आली नाही.
इचलकरंजी ; आर्थिक कारणातून पोलिस ठाण्यात हमरीतुमरी ?
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -