Monday, March 30, 2026
Homeइचलकरंजीजमिनीच्या वादातून सख्ख्या भावासह वडिलांचा कुर्‍हाडीने निघृणपणे खून! हातकणंगले तालुक्यातील घटना

जमिनीच्या वादातून सख्ख्या भावासह वडिलांचा कुर्‍हाडीने निघृणपणे खून! हातकणंगले तालुक्यातील घटना

हातकणंगले तालुक्यातील हिंगणगाव येथे अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून एका भावानेच आपल्या सख्ख्या भावाचा आणि वडिलांचा निर्घृण खून केल्याची घटना घडली असून परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबातील जमिनीच्या वाटपावरून मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. हा वाद इतका तीव्र झाला की त्यातूनच या दुर्दैवी घटनेला तोंड फुटले. आज दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास आरोपीने फावडे आणि कुऱ्हाडीचा वापर करून हा हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे.

 

धक्कादायक बाब म्हणजे, घटना घडल्यानंतर आरोपी स्वतःहून सायंकाळी सुमारे ६ वाजता पोलिस ठाण्यात हजर झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली असून पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -