Homeब्रेकिंगबुधवारी रात्री 8 वाजता सर्वकाही उद्ध्वस्त होणार, एक रात्र खूप, जगात हाहाकार,...

बुधवारी रात्री 8 वाजता सर्वकाही उद्ध्वस्त होणार, एक रात्र खूप, जगात हाहाकार, थेट ट्रम्प

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मोठी धमकी दिली. होर्मुज खाडी खुली करण्याकरिता त्यांना वेळ दिला. हेच नाही तर त्यांनी जगाची झोप उडवणारी धमकी दिली. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा म्हटले की, इराणने होर्मुज खाडी खुली नाही केली तर एका रात्रीत त्यांचा सर्व अध्याय संपेल. फक्त एका रात्रीत सर्वकाही संपेल आणि ती रात्र बुधवार असू शकते. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला होर्मुज खाडी खुली करण्याकरिता मंगळवारी 8 पर्यत वेळ दिला. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले होते की, मंगळवार ऊर्जा प्रकल्प डे आणि ब्रिज डे होणार. यामध्ये इराणचे ऊर्जा प्रकल्प आणि पायाभूत सुविधांवर हल्ला केला जाईल आणि त्यांना पूर्णपणे नष्ट केले जाईल. होर्मुज खाडी खुली करा नाही तर आम्ही हल्ला करणार अशी थेट धमकीच त्यांनी केली.

 

शनिवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला 48 तासाचा वेळ दिला. जर तोपर्यंत करार झाला नाही तर नरकात जा असेही त्यांनी थेटपणे म्हटले होते. यादरम्यान त्यांनी काही अपशब्दांचा वापर इराणविरोधात केला. मुळात म्हणज कच्च्या तेलासाठी होर्मुज खाडी अत्यंत महत्वाची आहे. ती खाडी बंद असल्याने जगात तेल समस्या निर्माण झाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दात म्हटले की, जर इराणकडून होर्मुज खाडी खुली करण्यात आली नाही तर आम्ही त्यांच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करू.

 

आता या युद्धात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला वेळ संपण्याकरिता काही तास शिल्लक आहेत. जर इराणने होर्मुज खाडी खुली नाही केली तर रात्री 8 दरम्यान इराणवर मोठा हल्ला होऊ शकतो. हेच नाही तर अमेरिकेने जाहीरपणे सांगितले आहे की, इराणच्या ऊर्जा प्रकल्पांना टार्गेट करून हल्ले केले जातील.

 

अमेरिका आणि इस्त्रायलच्या टार्गेटवर इराणचे ऊर्जा प्रकल्प असणार आहेत. जर हल्ला झाला तर या हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान होऊ शकते. डोनाल्ड ट्रम्प यांनी एका रात्रीत सर्वकाही संपू शकतो, अशी थेटपणे मोठी धमकी दिली आहे. इराणवर घातक हल्ले होण्याची शक्यता आहे. यावर इराणकडून काही मोठे विधान करण्यात आले नाही. पण डोनाल्ड ट्रम्प यांनी अपशब्दांचा वापर केल्याने अमेरिकेतच संतापचे वातावरण बघायला मिळत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -