Monday, July 28, 2025
Homeब्रेकिंगवारकरी सांप्रदयातुन दुःखद घटना; ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच निधन

वारकरी सांप्रदयातुन दुःखद घटना; ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच निधन

वारकरी सांप्रदयातुन एक दुःखद घटना समोर आली आहे. कित्येक वर्षाची परंपरा जपलेल्या ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे दुःखद निधन झाले आहे. ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांनी वयाच्या 89 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. आज गुरुवारी 26 ऑक्टोबरला दुपारी तीन वाजता नवी मुंबईतील नेरुळ येथील विठ्ठल जिमखाना मंदिरात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. तसेच त्यांच्यावर शुक्रवारी 27 ऑक्टोबर सायंकाळी पाच वाजता त्यांच्यावर नेरुळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. बाबा महाराज सातारकर यांच्या निधनाने वारकरी सांप्रदायावर शोककळा पसरली आहे.

 

ज्येष्ठ कीर्तनकार, निरुपणकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी सातारा जिल्ह्यात झाला आहे. बाबा महाराज यांचं शिक्षण त्या काळी इंग्रजी माध्यमातून झालं होत. त्यामुळे कीर्तनांसोबतच त्यांचं इंग्रजी भाषेवर देखील चांगलं प्रभुत्व होत. बाबा महाराज सातारकर यांच्या घरी अनेक वर्षांपासूनची वारकरी सांप्रदायाची परंपरा रुजली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक बाबा महाराज सातारकर यांचं कीर्तन ऐकण्यासाठी येत असत. बाबा महाराज यांनी विठ्ठलाचे कीर्तन आणि ज्ञानेश्वरी यावर बाबा महाराजांनी आयुष्य घालवलं आहे.

 

ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं योगदान जास्त आहे. ते कीर्तनांसोबतच जनसेवा देखील करत असल्याने त्यांनी चैतन्य अध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्थेची स्थापना केली आहे. त्यामुळे ते अध्यात्मिक क्षेत्रात सक्रिय होते. मात्र त्यांच्या या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -