Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंगबिग बॉस 17'मध्ये पार पडलं पहिलं एलिमिनेशन; 'या' स्पर्धकाचा प्रवास थांबला

बिग बॉस 17’मध्ये पार पडलं पहिलं एलिमिनेशन; ‘या’ स्पर्धकाचा प्रवास थांबला



छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रम आहे. काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमाचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. आता ‘वीकेंड का वार’ या सेगमेंटमध्ये ‘बिग बॉस 17’चं पहिलं एलिमिनेशन पार पडलं आहे. त्यामुळे घरातील पहिल्या स्पर्धकाचा प्रवास आता थांबला आहे. अभिनेत्री सोनिया बंसल (Soniya Bansal) ‘बिग बॉस 17’मधून एक्झिट घेणारी पहिली स्पर्धक ठरली आहे.सोनिया बंसलचा प्रवास थांबला…
‘बिग बॉस 17’च्या घरातून कोण बाहेर पडणार हे ठरवणं प्रेक्षकांच्या हातात होतं. या आठवड्यात ऐश्वर्या शर्मा, नील भट्ट, सोनिया बंसल, सना रईस खान, खानजादी आणि सनी आर्य उर्फ तहलका भाई हे स्पर्धक नॉमिनेट झाले होते. यात सना रईस खान आणि सोनिया बंसल यांना सर्वात कमी वोट्स मिळाले. या दोघींमधून कोण स्पर्धक बाहेर पडणार हे ठरवण्याची प्रेक्षकांची जबाबदारी होती. अखेर स्पर्धकांनी सनाला सेफ केलं असून सोनिया बंसलचा ‘बिग बॉस 17’चा प्रवास थांबला आहे.

सना खानला वाचवलं मित्रांनीच…
‘बिग बॉस 17’च्या पहिल्या आठवड्यातील ‘वीकेंड का वार’मध्ये एकही स्पर्धक घराबाहेर पडला नव्हता. त्यानंतर युट्यूबर तहलका, रॅपर खानजादी, वकील रईस खान, सोनिया बंसल, नील भट्ट, ऐश्वर्या शर्मा हे सहा स्पर्धक ‘बिग बॉस 17’साठी नॉमिनेट झाले. सना आणि सोनिया यांच्यात ‘बिग बॉस 17’मध्ये सना कमी अॅक्टिव्ह दिसली. पण मित्रांनी सना खानला वाचवलं.

सोनिया बंसल कोण आहे? (Who is Soniya Bansal)
सोनिया बन्सलचा जन्म 28 ऑक्टोबर 1996 रोजी आग्रा येथे झाला. तिचे वडील बैजनाथ बन्सल हे आर्मी ऑफिसर आहेत. सोनियाने शिक्षण पूर्ण केल्यानंतर मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली. तिने फिल्मफेअर आणि लॅक्मे या कंपन्यांच्या कार्यक्रमामध्ये रॅम्प वॉक देखील केला आहे. मॉडलिंग क्षेत्रात आपला ठसा उमटवल्यानंतर सोनियाने अनेक प्रसिद्ध म्युझिक व्हिडीओमध्ये देखील काम केले आहे. तिने झी, टी-सीरीज आणि व्हीनस यांच्या म्युझिक व्हिडीओमध्येही काम केले आहे.

‘बिग बॉस 17’मध्ये पहिल्या वाइल्ड कार्ड स्पर्धकाची एन्ट्री!
सलमान खानच्या ‘बिग बॉस 17’मध्ये आता पहिल्या वाईल्ड कार्ड स्पर्धकाची एन्ट्री झाली आहे. अभिनेत्री मनस्वी ममगई ‘बिग बॉस 17’ची पहिली वाईल्ड कार्ड स्पर्धक ठरली आहे. मनस्वी शेवटची काजोलच्या ‘द ट्रायल’ या वेबसीरिजमध्ये झळकली होती. या सीरिजमध्ये तिने मोहित सिंहची गर्लफ्रेंड जूही भाटियाची भूमिका साकारली होती. मनस्वीने ‘फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2010’ पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -