Saturday, February 14, 2026
Homeब्रेकिंगमामीसोबत भाचा फरार,नाराज मामाचं टोकाचं पाऊल; अख्खं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त !

मामीसोबत भाचा फरार,नाराज मामाचं टोकाचं पाऊल; अख्खं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त !

ताजी बातमी ऑनलाईन टीम

लग्न हे विश्वासवर टिकतं. पण तो विश्वास डळमळीत झाला की लग्न संपतं. पण ते फक्त दोन लोकांपुरतच नाही तर त्यामुळे संपूर्ण घर, हसतंखेळतं कुटुंब उद्ध्वस्त होतं. एका निर्णयाने संसाराची राखरांगोळी होऊ शकते. असाच एक वेदनादायक प्रकार उत्तर प्रदेशमध्येही घडला, जिथे पत्नीच्या एका निर्णयामुळे तिचा संसार तर मोडलाच पण तिच्या प्रियजनांच्या जीवावरही बेतलं. तीन मुलांची आई असलेल्या त्या महिलेने पतीला धोका दिला. तिचं तिच्याच भाच्यासोबत अफेअर होतं. एवढंच नव्हे तर पती आणि मुलांना सोडून ती भाच्यासोबत मुंबईला पळून गेली.

मात्र तिच्या पतीला ही गोष्ट समजल्यानंतर तो कोसळला, त्याला हा धक्काच सहन झाला नाही. बायकोच्या या वागण्यामुळे नाराज झालेल्या, दुखावलेल्या त्याने टोकाचं पाऊल उचललं आणि तीन मुलांना विषारी बिस्कीट खायला घातलं आणि स्वत:ही विषप्राशन केलं. यामध्ये त्या पतीचा दुर्दैवी मृत्यू झाल तर चिमुरड्या मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती अद्याप गंभीर आहे.

भाच्यासोबत होतं अफेअर
उत्तर प्रदेशातील राणीपूर परिसरातील निजामपूर गावचे हे प्रकरण आहे. व्यवसायाने मजूर असलेला धरमचंद हा तेथे पत्नी आणि तीन मुलांसह रहात होता. मजुरीच्या कामासाठी तो अनेकदा घराबाहेर असायचा. मात्र त्याचवेळी धरमचंदच्या पत्नीचे भाच्यासोबत प्रेमप्रकरण सुरू झालं. त्यानंतर १५ दिवसांपूर्वी ती आपल्या तीन निरागस मुलांना सोडून पुतण्यासोबत मुंबईला पळून गेली.

मुलांना जवळ बोलावलं आणि..

ही गोष्ट धरमचंद याला समजताच त्याला मोठा धक्का बसला. पत्नी सोडून गेल्यामुळे दु:खी झालेला तो अतिशय शांत आणि एकटा राहू लागला. त्याला तो धक्का सहनच झाला नाही. अखेर काल (रविवारी) रात्री त्याने त्याच्या तीन मुलांना जवळ बोलावलं, आणि त्यांना बिस्कीटं खायला दिली. वडिलांनी दिलेली बिस्कीट त्या निरागस मुलांनी लगेच खाल्ली, पण त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळू लागली. खरंतर, धरमचंद याने त्या बिस्किटांमध्ये विष मिसळले होते.

एवढंच नव्हे तर त्याने स्वत:ही विषप्राशन केले. मुलांचं आयुष्य संपवून त्याला स्वत:लाही जीव द्यायचा होता. बिस्कीट खाऊन मुलांची आणि नंतर धरमचंद याची प्रकृती ढासळू लागल्याने, त्यांना आरडाओरडा सुरू केला. त्यांचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी घरी धाव घेतली आणि तेथील परिस्थिती पाहून त्यांना उपचारांसाठी तातडीने रुग्णलयात दाखल केले. पण उपचारां दरम्यान दुर्दैवाने धरमचंद याचा मृत्यू झाला. तर त्याच्या तीन मुलांची प्रकृती अद्याप गंभीर आहे. वडिलांनी दिलेलं ते बिस्कीट त्या तीन चिमुरड्यांनी आनंदाने खाल्लं, पण त्यामध्ये असं काही असेल याची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती. आता ते मृत्यूशी झुंज देत आहेत.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि त्यांनी मुलांची स्थिती जाणून घेतली. टुंबिक तणावामुळे या मुलांचे वडील धरमचंद यांनी आपल्या मुलांना विष पाजले आणि स्वतः विष प्राशन केले, त्यामुळे धरमचंदचा मृत्यू झाला. याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे, असे पोलिसांनी सांगितले.

आयुष्यात कोणंतही संकट आलं तरी हार न मानता त्याचा सामना केला पाहिजे. आयुष्य संपवण हा काही मार्ग असू शकत नाही. आपलं आणि इतरांचही आयुष्य अनमोल आहे, ते एकदाच मिळतं, ते असं वाऱ्यावर उधळणं हा निश्चितच शहाणपणा नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -