तुमसर तालुक्यात दुपारी मेघगर्जनेसह झालेल्या पावसादरम्यान तीन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून एका महिलेसह २३ जनावरांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शेतकरी व पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
तालुक्यातील लोहारा शिवारात शेतीकाम करत असताना भीमलता भोजराम उचिबगले (वय ५०) यांच्यावर वीज कोसळली. गंभीर जखमी झालेल्या उचिबगले यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, देवनारा शिवारात वीज कोसळून तब्बल २२ शेळ्यांचा मृत्यू झाला. यामध्ये गौराबाई धनराज कोसरे यांच्या २, भारत भिका पेंदाम यांच्या १४, ताराचंद श्रावण सलाम यांच्या ३, कन्हैया सुदाम मरसकोल्हे यांच्या २ आणि देवीचंद सीताराम मेश्राम यांच्या १ शेळीचा समावेश आहे. एका क्षणात झालेल्या या दुर्घटनेमुळे संबंधित पशुपालकांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
तसेच सुकळी येथे वीज पडल्याने रूपेश मारुती चौधरी यांची एक म्हैस दगावली. अशा प्रकारे तालुक्यातील तीन ठिकाणी झालेल्या वज्राघाताच्या घटनांमध्ये एका महिलेसह एकूण २३ जनावरांचा बळी गेला.
घटनास्थळी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामे केले आहेत. स्थानिक तलाठ्यांनी नुकसानीचा अहवाल तयार करून तहसीलदार, तुमसर यांच्याकडे सादर केला असून, बाधितांना शासनाकडून मदत मिळण्याची.





