Saturday, August 2, 2025
Homeब्रेकिंगतयारीला लागा! 'या' तारखेला रंगणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार; पुन्हा पैलवान...

तयारीला लागा! ‘या’ तारखेला रंगणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार; पुन्हा पैलवान भिडणार

राज्यातील पैलवानांनासाठी आनंदाची बातमी आहे. (mahaharshtra kesari ) महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची (Pune Maharashtra Kesari 2023 ) घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार यंदा पुणे जिल्ह्याील फुगावमध्ये रंगणार आहे. या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 7 ते 10 नोव्हेंबर दरम्यान रंगणार आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजेत्याला महिंद्रा थार ( Mahindra Thar ) जीप, ट्रॅक्टर आणि रोख बक्षीस मिळणार आहे.

 

7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस आणि उपाध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होईल. तर स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेमध्ये साधारण 50 हजार प्रेक्षक क्षमता असलेले स्टेडियम उभारण्यात आलं आहे. शाळेचे संस्थापक दीपक पायगुडे यांनी स्टेडियमच्या व्यवस्थितसाठी सहकार्य केले आहे.

 

या स्पर्धेत 36 जिल्हा आणि 6 महानगरपालिका असे एकूण 42 संघ सहभागी होत आहेत. एका कुस्ती संघात गादी विभागातील 10 आणि माती विभागातील 10 असे एकूण 20 कुस्तीगीर 2 कुस्ती मार्गदर्शक आणि 1 संघ व्यवस्थापक असे एकूण 23 जणांचा सहभाग असेल. साधारण या कुस्ती स्पर्धेत 840 कुस्तीगीर 84 कुस्ती मार्गदर्शक आणि 42 व्यवस्थापक, 80 पंच आणि 50 पदाधिकारी असे एकूण 1100 जणांचा सहभाग असेल.

 

कुस्तीगीरांचे आगमन, वैद्यकीय तपासणी आणि वजने दिनांक 6 नोव्हेंबर रोजी होणार आहेत. 7 नोव्हेंबर रोजी स्पर्धेचे उद्घाटन होईल. त्यानंतर कुस्त्यांना सुरुवात होईल. 10 नोव्हेंबर सायंकाळी 4 वाजता सर्व वजन गटातील अंतिम कुस्त्या आणि महाराष्ट्र केसरी किताबाची कुस्ती होणार आहे. स्पर्धेतील उर्वरीत वजन गटात प्रथम क्रमांक मिळविलेल्या कुस्तीगीरास स्पेंडर दुचाकी, द्वितीय क्रमांकास रोख 20 हजार रोख आणि तृतीय क्रमांकास रोख 10 हजार रोख बक्षीस म्हणून देण्यात येतील. या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत शासनाच्या वतीने प्रथम क्रमांकास 60 हजार, व्दितीय क्रमांकास 55 हजार आणि तृतीय क्रमांकास 50 हजार रूपयांचे मानधन दरवर्षी प्रमाणे देण्यात येणार येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -