Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगगृहिणींना दिलासा, खाद्यतेलाच्या दरात मोठी घट; 'इतक्या' टक्क्यांनी किमती कमी

गृहिणींना दिलासा, खाद्यतेलाच्या दरात मोठी घट; ‘इतक्या’ टक्क्यांनी किमती कमी

बहुतांश अन्नधान्यांच्या दरात वाढ झालेली असताना खाद्यतेलाच्या दरात मोठी घट झाल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे. गेल्या दिवाळीच्या तुलनेत सूर्यफूल, पाम, सोयाबीन, सरकी तेलाच्या दरात ३० ते ३५ टक्क्यांनी घट झाली आहे.

 

बहुतांश अन्नधान्यांच्या दरात वाढ झालेली असताना खाद्यतेलाच्या दरात मोठी घट झाल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे. गेल्या दिवाळीच्या तुलनेत सूर्यफूल, पाम, सोयाबीन, सरकी तेलाच्या दरात ३० ते ३५ टक्क्यांनी घट झाली आहे. शेंगदाणा तेलाचे दर टिकून आहेत.

 

गेल्या वर्षी दिवाळीत खाद्यतेलांचे दर तेजीत होते. परदेशातून सूर्यफूल, पाम, सोयाबीन तेलाची आवक नियमित सुरू आहे. खाद्यतेलाची आयात वाढलेली आहे. इस्रायलमधील युद्धजन्य परिस्थिती, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलाला मागणी कमी झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाच्या दरात टप्प्याटप्प्याने घट झाली. गेल्या वर्षी दिवाळीतील खाद्यतेलाचे दर विचारात घेता यंदा खाद्यतेलांच्या दरात ३० ते ३५ टक्क्यांनी घट झाली आहे.

 

स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात नुकतीच १०० रुपयांनी वाढ झाली आहे. खाद्यतेले वगळता बहुतांश अन्नधान्याचे दर तेजीत आहेत. खाद्यतेलाच्या दरात घट झाल्याने दिवाळीत गृहिणींना दिलासा मिळाला आहे, असे निरीक्षण मार्केट यार्डातील चिमणलाल गोविंददास पेढीचे भागीदार, खाद्यतेल व्यापारी कन्हैयालाल गुजराती यांनी दिली.

 

जागतिक बाजारपेठेतील घडामोडींमुळे गेल्या वर्षी पाम तेल, सोयाबीन तेल, सूर्यफूल तेलाच्या दरात मोठी वाढ झाली. पाम, सोयाबीन, सूर्यफूल तेलाचे दर तेजीत होते. पामतेलाची आयात मलेशिया, इंडोनेशियातून केली जाते. सोयाबीन तेलाची आवक दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिनातून होते. रशिया- युक्रेनमधून सूर्यफूल तेलाची आवक होते. गेल्या वर्षी खाद्यतेलांच्या दरात मोठी वाढ झाली होती. त्या वेळी केंद्र शासनाने देशातील प्रमुख तेलआयातदारांना २० लाख टन तेलाच्या आयातीवर आयातशुल्क माफ केले होते.

 

आयातशुल्क माफ केल्याने तेलदरात घट झाली तसेच जागतिक बाजारपेठेतून खाद्यतेलाचा पुरवठा सुरळीत झाल्यानंतर गेल्या वर्षभरापासून खाद्यतेलाच्या दरात टप्प्याटप्प्याने घट झाली, असे त्यांनी सांगितले. किरकोळ बाजारात एक किलो सोयाबीन, सूर्यफूल, पाम, सरकी तेलाचे दर ९० ते १०० रुपयांदरम्यान आहेत.

 

काही वर्षांपूर्वी दिवाळीत घरोघरी फराळाचे पदार्थ तयार केले जायचे. गेल्या काही वर्षांपासून गृहिणी बाजारपेठेतून तयार फराळाचे पदार्थ खरेदी करतात. कामाच्या व्याप सांभाळून फराळाचे पदार्थ तयार करणे गृहिणींना शक्य होत नाही. त्यामुळे तयार फराळाचे पदार्थ खरेदी करण्याकडे कल वाढला असून, दिवाळीत मिठाईविक्रेते, फराळ तयार करणाऱ्यांकडून खाद्यतेलांना मागणी वाढते. घरगुती ग्राहकांकडून खाद्यतेलांना असलेल्या मागणीत घट होत चालली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -