नाना पाटेकर हे मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते. नानांनी आजवर अनेक सिनेमांंमधून स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली. नाना पाटेकर यांचा एक व्हिडीओ काल सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओत सेल्फी घ्यायला आलेल्या एका फॅनला नाना पाटेकर यांनी मारल्याचं दिसलं. नाना पाटेकर यांनी या प्रकरणाबद्दल जाहीर माफी मागत, नेमकं काय घडलं याचा खुलासा केलाय.नाना पाटेकरांचा माफीनामा, सांगितलं खरं कारणनाना पाटेकर म्हणतात, ‘एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मी एका मुलाला मारल्याचं दिसतंय. हा सीन करणं आमच्या चित्रपटाचा भाग आहे, आमची रिहर्सल सुरु होती. त्यावेळी दिग्दर्शकाने या सीनची फायनल रिहर्सल करायाला सांगितली. व्हिडिओमध्ये दिसणारा मुलगा आला तेव्हा आम्ही रिहर्सलला सुरुवात करणार होतो.नाना पाटेकर पुढे म्हणाले, ‘मला माहित नव्हते की तो कोण होता? मला वाटले की तो आमच्या क्रूपैकी एक आहे, म्हणून मी त्याला रिहर्सलनुसार त्याला मारलं आणि त्याला निघून जाण्यास सांगितले. नंतर मला कळले की तो क्रूचा भाग नव्हता, म्हणून मी त्याला परत बोलावले, पण तो पळून गेला. हा व्हिडिओ त्याच्या मित्राने शूट केला असण्याची शक्यता आहे.नाना पाटेकर म्हणाले, ‘मी कधीही कोणाला फोटो काढण्यास नकार दिला नाही. मी असे कधीच केले नसते…जे काही झाले ते चुकून झाले. काही गैरसमजांमुळे हे घडले. मला क्षमा करा. मी पुन्हा असं कधीच करणार नाही’.नाना पाटेकर यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्यांना नाराजी सहन करावी लागली. अखेर त्यांनी जाहीर माफी मागितल्याने या वादावर पडदा पडला असं म्हणता येईलनाना पाटेकर सध्या वाराणसीत ‘जर्नी’ चित्रपटाचं शुटींग करत आहेत. ‘गदर 2’ फेम दिग्दर्शक अनिल शर्मा या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. नाना पाटेकर व्यतिरिक्त अभिनेता उत्कर्ष शर्मा देखील ‘जर्नी’ मध्ये दिसणार आहे