Wednesday, December 4, 2024
Homeक्रीडानवा भिडू आणि नवा डाव! Rohit Sharma कर्णधार होताच टीम इंडियातून 8...

नवा भिडू आणि नवा डाव! Rohit Sharma कर्णधार होताच टीम इंडियातून 8 क्रिकेटपटूंचा पत्ता कट

टी-20 वर्ल्डकप 2021 नंतर (T20 World Cup 2021) विराट कोहलीने (Virat Kohali) कर्णधारपद सोडलं आहे. त्यातच न्यूझीलंडविरुद्ध (IND vs NZ) सुरू होणाऱ्या T-20 मालिकेसाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. सलामीवीर रोहित शर्माकडे (Rohit Sharma) टीम इंडियाचं नेतृत्त्व सोपवण्यात आले आहे. (T20I Captain for Team India) तर सलामीचा फलंदाज केएल राहुलकडे (KL Rahul) उपकर्णधारपदाची जबाबादरी देण्यात आली आहे. रोहित शर्माने कर्णधारपद स्विकारताच 8 क्रिकेटपटूंचा संघातून पत्ता कट करण्यात आला आहे. यात विराट कोहलीचा समावेश आहे. तसेच संघात 3 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात 17, 19 आणि 21 नोव्हेंबर रोजी तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. तर पहिली कसोटी 25 ते 29 नोव्हेंबर दरम्यान कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. विराट कोहली टी-20 मालिकेत तसेच पहिल्या कसोटी सामन्यात मैदानात दिसणार नाही. तो मुंबईतील दुसऱ्या कसोटीत संघात पुनरागमन करेल.

विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, हार्दिक पंड्या, राहुल चाहर आणि वरुण चक्रवर्ती यामधून हार्दिक, वरुण आणि राहुल चाहरला वगळण्यात आलं आहे. तर उर्वरित क्रिकेटपटू हे सातत्याने खेळत होते. त्यांना विश्रांतीची गरज होती. तसेच या क्रिकेटपटूंचं कसोटी मालिकेसाठी पुनरागमन होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -