Monday, November 11, 2024
Homeनोकरीविद्यार्थ्यासाठी मोठी बातमी! 18 नोव्हेंबरपर्यंत

विद्यार्थ्यासाठी मोठी बातमी! 18 नोव्हेंबरपर्यंत

एमएचटी सीईटी परीक्षांचे निकाल (MHT CET Exam Results) जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेची प्रतीक्षा होती. आता ही प्रतिक्षा संपुष्ठात आली आहे. इंजिनिअरिंग प्रवेशाची (Engineering Admission) प्रक्रिया सुरू झाली आहे. इंजिनिअरिंगसाठी ऑनलाइन प्रवेश अर्जाची मुदत 18 नोव्हेंबरपर्यंत आहे. अभियांत्रिकी पदवी प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले आहे. प्रत्यक्ष कॅप राउंडच्या प्रक्रियेस 18 नोव्हेंबरपासून सुरुवात होईल, अशी माहिती सीईटी सेलने दिली आहे.

शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी ही प्रवेशप्रक्रिया राबवली जात आहे. सीईटीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील प्रक्रियेची प्रतीक्षा होती. नुकतेच सीईटी सेलने वेळापत्रक प्रसिद्ध केले असून त्यानुसार सीईटी दिलेल्यांना ऑनलाइन नोंदणी व आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यास 18 नोव्हेंबरच्या सायंकाळी 5 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. 27 नोव्हेंबरला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होऊन नंतर कॅप राउंड सुरू होणार आहेत. कागदपत्रे अपलोडनंतर ई-स्क्रूटिनी व सुविधा केंद्रावर जाऊन कागदपत्रांच्या पडताळणीसाठी स्क्रूटिनीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

– ऑनलाइन अर्ज व कागदपत्र अपलोड : 18 नोव्हेंबरपर्यंत
– कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया : 20 नोव्हेंबरपर्यंत
– प्रारूप गुणवत्ता यादीची प्रसिद्धी : 22 नोव्हेंबर
– यादीशी निगडित तक्रार, हरकती नोंदवणे : 23 ते 25 नोव्हें.
– अंतिम गुणवत्ता यादी : 27 नोव्हेंबर
– पहिल्या कॅप राउंडसाठी नोंदणीची प्रक्रिया : 27 ते 30 नोव्हेंबर
– पहिली वाटप यादी : 2 डिसेंबर
– प्रवेश निश्चितीची मुदत : 3 ते 5 डिसेंबर

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -