टेलीकॉम कंपनी Reliance Jio नं सप्टेंबरमध्ये Jio AirFiber सेवा लाँच केली होती जी 5G FWA (fixed-wireless access) सर्व्हिस आहे. तसेच, लाँचच्या वेळी कंपनीनं AirFiber सर्व्हिससह ६ नवीन प्लॅन (Jio AirFiber रेग्युलर आणि Jio AirFiber Max) लाँच केले होते. तसेच, आता कंपनीनं युजर्ससाठी एक नवीन आणि स्वस्त प्लॅन सादर केला आहे. ह्या प्लॅनची किंमत फक्त ४०१ रुपये आहे. चला पाहूया ह्या प्लॅनमधील बेनिफिट्स.Jio AirFiber चा ४०१ रुपयांचा प्लॅन
नवीन प्लॅनची किंमत ४०१ रुपये आहे. ह्या प्लॅनमध्ये युजर्सना १टीबी म्हणजे १०००जीबी डेटा दिला जात आहे. परंतु जिओचा हा प्लॅन एक डेटा बूस्टर प्लॅन आहे, ज्या युजर्सना बेस प्लॅनसह एक्स्ट्रा डेटाची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी हा प्लॅन सादर केला आहे. ह्या प्लॅननं तेव्हा रिचार्ज करता येईल जेव्हा तुमच्याकडे एक बेस प्लॅन अॅक्टिव्ह असेल.
डाटा बूस्टर प्लॅन युजर्सच्या बेस प्लॅनच्या व्हॅलिडिटी पर्यंत वैध असेल. समजा जर तुमच्याकडे १ महिन्याचा प्लॅन अॅक्टिव्ह असेल तर डेटा बूस्टर प्लॅन अंतगर्त मिळणारा १टीबी डेटाचा वापर तुम्ही १ महिनाभर करू शकता.असे आहेत Jio AirFiber चे प्लॅन
जिओ एअरफायबरच्या रेग्युलर प्लॅनमध्ये तीन प्लॅनचा समावेश आहे, ज्यांची किंमत ५९९ रुपये, ८९९ रुपये आणि ११९९ रुपये आहे. तसेच, मॅक्स प्लॅनमध्ये १४९९ रुपये, २४९९ रुपये आणि ३,९९९ रुपयांचे प्लॅन आहेत.विशेष म्हणजे कंपनीच्या सर्व जिओ एअर फायबर प्लॅन्स मध्ये युजर्सना ५५० पेक्षा जास्त डिजिटल चॅनेल आणि अनेक OTT प्लॅटफॉर्म्सचा अॅक्सेस मिळतो. तसेच नवीन ग्राहक सर्व प्लॅन्स ६ ते १२ महिन्यांसाठी घेऊ शकतात.
विशेष म्हणजे जिओ एअर फायबर सर्व्हिस सध्या एकूण ४९४ शहरांमध्ये उपलब्ध झाली आहे. कंपनी ही सर्व्हिस देशातील २१ राज्यांमध्ये देत आहे. तसेच, जिओ फायबरमध्ये नेटवर्क कव्हरेजसाठी वायर्ड फायबर ऑप्टिक केबलचा वापर केला जातो.