Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगअंबप फाट्याजवळ कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार पेठ

अंबप फाट्याजवळ कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार पेठ

पुणे-बंगळुरू महामार्गावर महामार्ग ओलांडणार्‍या दुचाकीस भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. गणेश अनिल निकम (वय २३) असे मृत युवकाचे नाव आहे. तर त्याचा लहान भाऊ वैभव अनिल निकम (२१ रा. सहारा चौक, पेठवडगाव) हा गंभीर जखमी झाला. अंबप फाट्याजवळ गुरुवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, पेठ वडगाव येथील सहारा चौक येथे राहणारे गणेश व अनिल निकम हे दोघे भाऊ अंबप फाट्याजवळील एका कंपनीत काम करतात. नेहमीप्रमाणे सकाळी ते कामासाठी निघाले होते. महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे . यामध्ये अंबप फाट्यावर उड्डाण पुलाचे काम सुरु असल्याने काही अंतरावर महामार्ग ओलांडून पलीकडे जाण्यासाठी दुभाजक खुला करण्यात आला आहे . दरम्यान महामार्ग ओलांडत असताना कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघेही भाऊ रस्त्यावर आदळले .यात गणेश याच्या डोक्याला जबरी मार लागला तर वैभव गंभीर जखमी झाला. जखमींना १०८ रुग्णवाहिकेतुन कोल्हापूर येथील रुग्णालयात नेण्यात येत होते .मात्र गणेश याचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला. चारचाकी वाहनामधील महिला रोणीता अहुजा, अनमोल डिक्वेस्टा जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातातील दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून दोन्ही वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत .अपघाताची नोंद वडगाव पोलिसात झाली आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -