बहुतेक पगारदार लोक आपल्या कष्टाची कमाई सुरक्षित ठिकाणी गुंतवण्यासाठी पर्याय शोधत असतात. यासाठी बँकाच्या फिक्स्ड डिपॉझिट (FD) किंवा मुदत ठेव योजना कामी येतात. त्यामुळे जर तुम्हीपण बँकांच्या वेगवेगळ्या FD मध्ये पैसा गुंतवण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सर्वोत्तम FD (SBI सर्वोत्तम FD) योजनेवर गुंतवणूकदारांना ७.९% वार्षिक व्याज देत आहे.विशेष म्हणजे SBI च्या सर्वोत्तम FD योजनेत पीपीएफ, एनएससी आणि पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांपेक्षा जास्त व्याज मिळत आहे.एसबीआय सर्वोत्तम FD योजनेचे फायदे
स्टेट ऑफ इंडियाच्या या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ही स्कीम केवळ एक आणि दोन वर्षासाठी आहे. तर SBI सर्वोत्तम योजनेत ठेवीदारांना दोन वर्षांच्या ठेवी म्हणजेच FD वर ७.४% दराने व्याज दिले जात आहे जो की सामान्यांसाठी असून ज्येष्ठ नागरिकांना या योजनेवर ७.९० टक्के व्याजाचा लाभ दिला जात आहे. त्याचबरोबर एका वर्षाच्या गुंतवणुकीवर सर्वसामान्यांना ७.१०% तर ज्येष्ठ नागरिकांना ७.६० टक्के व्याज मिळत आहे.एसबीआयच्या सर्वोत्तम टर्म डिपॉझिट योजनेमध्ये एक किरकोळ (रिटेल) गुंतवणूकदार किमान १५ लाख रुपयांपर्यंत गुणवणूक करू शकतो. त्याच वेळी, गुंतवणुकीची कमाल गुंतवणूक मर्यादा योजना दोन कोटी रुपये असून यामध्ये बँक एक वर्ष आणि दोन वर्षांच्या गुंतवणुकीच्या कालावधीचे दोन पर्याय देते.