Sunday, August 3, 2025
Homeब्रेकिंग2047 पर्यंत देशात धावणार 4500 वंदे भारत एक्सप्रेस- ज्योतीरादित्य सिंधीया

2047 पर्यंत देशात धावणार 4500 वंदे भारत एक्सप्रेस- ज्योतीरादित्य सिंधीया

 

Express ट्रेन ही भारतात 2019 साली आली. त्यानंतर तिच्या विकासात सतत वाढ होत गेली. वंदे भारतच्या निर्मितीमुळे प्रवाशांचा वेळ वाचायला लागला त्यामुळे या ट्रेनला प्रवाश्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.तसेच या गाडीचा वेग आणि यामध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधा यामुळे वंदे भारत कमी कालावधीत लोकांच्या पसंतीस पडत आहे. त्यामुळे या ट्रेनची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यातच आता नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतीरादित्य सिंधीया यांनी पत्रकार परिषदेमध्ये या ट्रेनची संख्या 2047 पर्यंत तब्बल 4500 एवढी करण्यात येणार आहे. असे सांगितले.

 

ज्योतीरादित्य सिंधीया म्हणाले कि, आज संपूर्ण देशात एकूण 23 वंदे भारत ट्रेन (Vande Bharat Express) धावत आहेत. परंतु 2047 पर्यंत देशभरात 4500 वंदे भारत ट्रेन चालवण्याचे ध्येय आहे. ते पुढे म्हणाले, 2013 – 14 मध्ये रेल्वे बजेट 29 हजार कोटी रुपये होते मात्र आता तेच बजेट 2 लाख 40 हजार कोटी झाले आहे. तसेच भारत सरकार येत्या काही वर्षात गाड्यांमधून कार्बनच्या उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्यासाठी काम करत आहे सेही सिंधीया यांनी सांगितलं. याशिवाय पुढच्या तीन वर्षात बुलेट ट्रेन सुरु करण्याच्या दिशेने भारत पाऊल टाकत आहे अशी माहिती सुद्धा ज्योतीरादित्य सिंधीया यांनी दिली.

 

ज्योतीरादित्य सिंधीया यांनी बोलताना पुढे सांगितले की, 2014 पूर्वीची देशाची अवस्था आणि सध्याची अवस्थायामध्ये खूप फरक आहे. 2014 नंतर जसे मोदींचे आगमन झाले तसा देश विकासाच्या पथावर जाऊ लागला. त्यामुळे सध्या भारतीय रेल्वे दुरुस्तीच्या दिशेने पाऊल उचलत आहे. त्यासाठी 10 लाख कोटींचा प्रकल्प हा हाती घेण्यात आला आहे. तसेच जगातील सर्वात उंच रेल्वे पूल हा जम्मू आणि काश्मीर मध्ये बांधला जात आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -